Anant geete Bhaskar Jadhav Verbal fight : रायगड लोकसभा मतदार संघातून अनंत गीते हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या अनंत गीतेंच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) देखील उपस्थित होते. यावेळी प्रचार सभेत गीते बोलत असताना अचानक भास्कर जाधव यांनी माईक हातात घेतला आणि त्यांना शब्द मागे घेण्याची विनंती करत कठोर शब्दात खडेबोल सुनावले. यामुळे ठाकरे गटात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा सुरू झाली होती. (anant geete bhaskar jadhav verbal fight in guhagar sabha raigad lok sabha constiuency)
ADVERTISEMENT
अनंत गीते यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेला भास्कर जाधव देखील उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी अनंत गीते यांचे भाषण चालू असतानाच माईक हातात घेऊन भर सभेत अनंत गीतेंना सुनावलं. यावेळी अनंत गीते मतदारांना संबोधित करताना म्हणाले की, मागची लोकसभा निवडणूक मी तटकरेंविरूद्ध लढलो नाही, तर मी भास्करराव जाधवांविरोधात लढलो. अनंत गीते असे बोलताच भास्करराव जाधवांनी माईक हातात घेतला आणि त्यांना असे विधान टाळण्याची विनंती केली.
हे ही वाचा : ''बारामतीत धनशक्तीचा वापर होणार आणि...'', रोहित पवारांच्या आईचा खळबळजनक आरोप
जाधव यावेळी म्हणाले, ''सॉरी गिते साहेब पण मला असं वाटतं, तुम्ही या गोष्टी बोलण आता टाळलं पाहिजे, त्याचे कारण तुमचे हे खाली चेलेचपाटे आहेत, ते वेगळ्या अर्थाने प्रचार करतायत. आता दोन शब्द माझ्य़ासमोर बोलले, भास्करशेठ गितेंच्या विरोधात... मी ज्या पक्षाचा होतो, त्या पक्षाच काम करत होतो, मी तुमच्या विरोधात कुठं, पहिला असं होतं. तुमच्या विरोधात होतो, जमलं तर हे बदला.. भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंसोबत होते, मी पक्षात राहून कधीही गद्दारी केली नाही, असे जाधवांनी यावेळी स्पष्ट केले.
जाधवांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर गीतेंनी पुन्हा भाषणास सुरूवात केली. तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही. तटकरेंचे इथे काही नाही. कालही नव्हत, आजही नाही आहे. आता जमेची बाजू अशी आहे, भास्करराव जाधव आणि अनंत गिते आम्ही एक आहोत. त्यामुळे या मतदार संघात आपल्याला प्रतिस्पर्धी राहायलाच नाही आहे, असे गीतेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान प्रचारसभेत घडलेला हा प्रसंग पाहून दोन्ही नेत्यांमधली उघड नाराजी पुन्हा समोर आली होती.
ADVERTISEMENT