Sangli Lok Sabha Exit Poll, Baramati Lok Sabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १ जून रोजी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. महाराष्ट्रात महायुतीला फटका बसताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीचेही लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काय होणार, याबद्दल सगळ्यांचे लक्ष आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात काय होणार, याबद्दलही एक्झिट पोलने अंदाज मांडला आहे. (who will be win in Baramati lok sabha And Sangli lok Sabha? What is India Today Axis my India Exit poll predictions)
ADVERTISEMENT
Baramati Lok Sabha : पवार विरुद्ध पवार
बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष बघायला मिळाला. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
बारामतीतून कोण जिंकणार याचा अंतिम निर्णय 4 जून रोजी येईल. पण, इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया (India Today-Axis My India exit poll) एक्झिट पोलने अजित पवारांची चिंता वाढवणारा अंदाज व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> Exit Poll मध्ये शरद पवारांचा 'आकडा' ठरला खरा!
बारामती लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होईल आणि सुप्रिया सुळे या वरचढ ठरतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये मांडला आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या निकालाची उत्सुकता वाढली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात कोणते पाटील जिंकणार?
सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत प्रचंड घुसळण झाल्याचे बघायला मिळाले. काँग्रेसने या मतदारसंघासाठी प्रयत्न केले. पण, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जागावाटपा आधीच उमेदवार घोषित करून सांगलीवर कब्जा मिळवला.
हेही वाचा >> भाजपचं स्वप्न धुळीस? सर्व एक्झिट पोलने उडवली महायुतीची झोप
त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. सांगली मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांना संधी दिली आहे. तर ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांनी तिकीट दिले. त्यामुळे तिन्ही पाटलांमध्ये सांगली लढत होत असली, तर खरी लढत विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातच झाली.
इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया (India Today-Axis My India exit poll) एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. संजयकाका पाटील यांचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना किती मते मिळणार, याबद्दलही उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT