BJP 2nd list Declare Pratap Simha : गेल्या वर्षी नवीन संसदेच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याची घटना घडली होती. ही घटना भाजप खासदाराने दिलेल्या विझिटींग पासमुळे घडल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे या घटनेनंतर विरोधकांनी भाजप खासदावर कारवाईची मागणी केली होती. मात्र भाजपकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. त्यात आता भाजपने या घटनेला गांभीर्याने घेऊन खासदाराचं तिकीटच कापलं आहे. प्रताप सिम्हा असे या खासदाराचं नाव आहे. प्रताप सिम्हा (Pratap Simha) यांनी दोनदा मैसूर कोडागू लोकसभा मतदार संघातून निवडणूक जिंकली होती. मात्र खासदारकीच्या तिसऱ्या टर्मआधी भाजपने त्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे प्रताप सिम्हा यांना मोठा धक्का बसला आहे. ( bjp 2nd candidate list lok sabha election 2024 cut pratap simha ticket use visitor pass to enter parliment secutity breach)
ADVERTISEMENT
संसदेत काय घडलेलं?
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापणादिनी नवीन संसदेच्या सुरक्षेत मोठी चुक झाली होती. संसदेचे नियमित कामकाज सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतून दोन तरूणांनी सभागृहात उड्या घेतल्या होत्या. यानंतर या तरूणांनी त्यांच्या बुटातून स्प्रे बाहेर काढत संसदेत अश्रूधुर सोडले होते. यावेळी संसदेत एकच खळबळ माजली होती. त्यानंतर संसदेत उपस्थित असलेल्या खासदारांनी या दोन तरूणांना पकडले होते. याच दरम्यान संसदेच्या आवारातही दोघांनी घोषणाबाजी देत अश्रूधुर सोडले होते. या सर्व घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर या तरूणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले होते.
हे ही वाचा : Lok Sabha : संजय निरूपम-अशोक चव्हाण भेटीमागे काय शिजतंय?
दरम्यान या घटनेचा तपास सूरू असताना दोन्ही आरोपींनी खासदार प्रताप सिम्हा यांच्या संदर्भाने बनवलेल्या व्हिजिटींग पासद्वारे संसदेत प्रवेश केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे विरोधकांनी खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाईची मागणी केलीा होती. मात्र भाजपने सिम्हा यांच्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती. पण आता प्रताप सिम्हा यांचे तिकीट कापून भाजपने त्यांना मोठा धक्का दिला आहे.
भाजपने दुसऱ्या यादीत कर्नाटकमधील 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपने म्हैसूर-कोडागू लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रताप सिम्हा यांचे तिकीट कापले आहे. त्यांच्या जागी पक्षाने यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान प्रताप सिम्हा यांनी लोकसभा निवडणुकीत म्हैसूरची जागा दोनदा जिंकली होती. पण सिम्हा यांच्याबाबत अनेक वाद निर्माण झाल्यानंतर पक्षाने आता त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रताप सिम्हा यांना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT