Raju Parwe Join Eknath Shinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या काही तासातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू पारवे यांनीशिवसेनेत प्रवेश केला आहे.पारवेंच्या या शिवसेनेतील प्रवेशानंतर त्यांची रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी पक्की मानली जात आहे.तर कृपाले तुमानेंचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. (congress mla raju parwe join eknath shinde shivsena resigned frome congress membership ramtek lok sabha constituency)
ADVERTISEMENT
पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे.यासाठी भाजपने नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.तर रामटेकचा पेच कायम होता. त्यात जागावाटपात नागपूर भाजपाकडे होता,तर रामटेकची जागा शिवसेनेची होती. त्यामुळे दोनवेळ खासदार राहिलेल्या कृपाल तुमानेंना शिवसेनेतून रामटेकमधून लोकसभा लढवण्याची संधी होती.
हे ही वाचा : शरद पवारांचा महादेव जानकरांनी केला 'गेम'! महायुतीत मोठी घडामोड
दरम्यान भाजपने रामटेकच्या जागेवर दावा सांगितला होता. या जागेसाठी भाजपकाँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना गळाला लावण्याचा देखील प्रयत्न करत होती.पण शिवसेना रामटेकची जागा सोडायला तयार नव्हती. पण आज अखेर या जागेवर महायुतीने तोडगा निघालाय.
राजू पारवे यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.दरम्यान आता राजू पारवेंच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर आता त्यांना रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 : राणांना निवडणूक जाणार जड, बच्चू कडू उतरवणार 'भिडू'!
रामटेकमधून आता शिवसेनेच्या तिकीटावर राजू पारवे लोकसभा लढवतील. त्यामुळे आता कृपाल तुमानेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या जागेबाबत आता लवकर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT