Madha Lok Sabha : जयंत पाटलांनी 'आमचं ठरलंय' म्हणताच भाजपचं वाढलं टेन्शन! रात्रीत काय घडलं?

मुंबई तक

15 Apr 2024 (अपडेटेड: 15 Apr 2024, 12:13 PM)

Madha lok Sabha constiuencey latest Update : जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाने भाजपच्या चिंतेत कशी भर घातली, देवेंद्र फडणवीसांनी रात्रीतून पाठवला मेसेज.

माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक अपडेट

माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी बदलली?

follow google news

बातम्या हायलाइट

point

माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

उत्तमराव जानकर महाविकास आघाडीसोबत येणार?

point

देवेंद्र फडणवीस, अमित शाहांसोबत जानकर यांची बैठक

Madha Lok Sabha Election 2024 : (वसंत मोरे, बारामती) माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचं गणित कठीण बनलं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी फुंकली आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात दंड थोपटले. याच पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे भाजपचं टेन्शन वाढलं. त्यानंतर रात्रीतून भाजपने माढात आणखी धक्के बसणार नाही, यासाठी भाजपने रात्रीतूनच काम सुरू केलं. जयंत पाटील नेमकं काय बोलले आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी साथ सोडल्यानंतर काय घडलंय? (uttamrao jankar, shahaji bapu patil and jaykumar gore in nagpur for meet to Devendra Fadnavis)

हे वाचलं का?

अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी भाजपसोबत असलेल्या काही नेत्यांबरोबर उत्तम जानकर यांच्याबद्दल एक विधान केले. 

पाटील म्हणाले की, "आता माढ्याची चिंता करू नका. सांगोला, माण खटावची चिंता करू नका. फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरल्यानंतर मला उत्तमराव जानकरांचा फोन आला होता. ते म्हणाले, 'तुम्ही करताय ते चांगलं करताय. आम्ही दोघेही एक होणार आहे. मीही त्यांना साथ देणार आहे', असं सांगत पाटील म्हणाले, आता जानकरांचं आणि माझंही ठरलं आहे."

हेही वाचा >> Salman Khan च्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं रायगड कनेक्शन! 

उत्तम जानकर यांचे नाव घेत जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं की, माढ्यात मोहिते पाटलांना जानकर मदत करतील. जयंत पाटलांच्या याच विधानाने भाजपच्या चिंतेत भर घातली. कारण उत्तम जानकर यांचा समर्थक मतदार माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोठा आहे. त्यांना गमावणं भाजपसाठी माढ्यात महागात पडू शकतं. त्यामुळे रात्रीतून त्यांना निरोप पाठवला गेला आणि एक चार्टड विमानही बारामतीच्या विमानतळावर उतरलं. 

चार नेते फडणवीसांच्या भेटीसाठी नागपुरात

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर माढा लोकसभा मतदारसंघात उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेबद्दल चर्चा सुरू झाली. त्यामुळे उत्तमराव जानकर यांना सोबत ठेवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा >> भाजपला 14 ते 17 जागा; 'मविआ'ला किती? महायुतीला टेन्शन देणारा पोल 

भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उत्तमराव जानकर, आमदार जयकुमार गोरे, शाहाजी बापू पाटील हे नेते सकाळीच नागपूरला निघून गेले. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तमराव जानकर यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे चर्चा करणार आहेत. त्यांची अमित शाह यांच्यासोबतही चर्चा करून दिली जाणार आहे. 

माढात रणजितसिंह नाईक निंबाळकरांची सोपी लढाई बनली अवघड

दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी सुरूवातीला माढा लोकसभा मतदारसंघातील समीकरणं अनुकूल दिसत होती. पण, रामराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर काही नेत्यांनी नाराजी सूर लावला. 

त्यांची नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली, पण माढ्यात भाजपला १४ एप्रिल रोजी जबर धक्का बसला. माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने भाजपची साथ सोडली. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजयी गुलाल उधळण्याचा मार्ग कठीण झालेला दिसत आहे.

हेही वाचा >> श्रीकांत शिंदेंना घेरण्याची तयारी? संजय राऊतांचे थेट मोदींना पत्र 

त्यासाठी आता रणजितसिंह नाईक निंबाळकर धावपळ करताना दिसत आहे. आता उत्तमराव जानकर यांची मनधरणी करण्यात भाजपला यश मिळते का? हेही बघणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर हे किती साथ देतात, त्यावरही माढ्यातील निकालाचं गणित अवलंबून असणार आहे. 

    follow whatsapp