Congress Maharashtra 1st list: काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर, 'या' नेत्यांना दिली उमेदवारी

मुंबई तक

21 Mar 2024 (अपडेटेड: 21 Mar 2024, 10:40 PM)

लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसनेही आता महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना केवळ सातच उमेदवारांची घोषणा केली आहे.

काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर

काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर

follow google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर

point

काँग्रेसच्या यादीत 7 जणांची नावं

point

रवींद्र धंगेकर यांना लोकसभेचं तिकीट

Lok Sabha Election 2024: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर काँग्रेसने महाराष्ट्रातील 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असल्याने सर्वच पक्ष अगदी सावधपणे पावलं उचलत आहेत. सुरुवातीला भाजपने महाराष्ट्रातील केवळ 20 उमेदवारांची नावं जाहीर केली. तर आता काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना केवळ सातच उमेदवारांची घोषणा केली आहे. (lok sabha election 2024 congress announced first list in maharashtra gave ticket to 7 leaders including praniti shinde shahu maharaj ravindra dhangekar)

हे वाचलं का?

 

पाहा कोणाकोणाला दिली काँग्रेसने उमेदवारी

  1. कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
  2. सोलापूर - प्रणिती शिंदे 
  3. पुणे - रवींद्र धंगेकर
  4. अमरावती - बळवंत वानखेडे 
  5. लातूर - शिवाजीराव कलगे 
  6. नांदेड - वसंतराव चव्हाण
  7. नंदूरबार - गोवाल पाडवी
     

 

कोल्हापूर आणि अमरावती या जागांवर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसने आधीपासून दावा केला होता. अमरावतीतून शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांना तिकीट दिलं होतं. पण अपक्ष उमेदवार नवनीत राणांनी त्यांना पराभूत केलं होतं. तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ हे सध्या शिंदे गटात आहेत. पण तरीही ठाकरेंनी अमरावतीवर दावा सांगितला होता. पण आता, काँग्रेसने अमरावतीमधून थेट बळवंत वानखेडे यांचं नाव जाहीर केल्याने ठाकरेंनी ती जागा सोडल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच कोल्हापूरच्या जागेवर देखील शिवसेनेचा दावा होता. पण आजच्या यादीत काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा ठाकरेंना सोडव्या लागल्या आहेत. मात्र, असं असलं तरी या बदल्यात ठाकरेंना नेमक्या कोणत्या जागा मिळाल्या आहेत हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या जागेऐवजी शिवसेनेने सांगलीची जागा मागितली असून आज (21 मार्च) जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची शिवसेना (UBT) उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.

मात्र, असं असलं तरीही मुंबईतील दोन मतदारसंघाबाबत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तोडगा निघू शकलेला नाही. मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर देखील काँग्रेस-शिवसेनेने दावा सांगितला आहे. त्यामुळे तूर्तास काँग्रेसने सातच उमेदवार जाहीर केले आहेत. 

शिवसेना (ठाकरे गट)-राष्ट्रवादीचं (शरद पवार गट) नेमकं काय ठरलं?

एकीकडे काँग्रेसने सात उमेदवार जाहीर केलेले असताना दुसरीकडे ठाकरे गट किंवा शरद पवार गटाने आपले उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून बरीच चढाओढ सध्या सुरू आहे.  

    follow whatsapp