Lok Sabha Election 2024 : गिरीश महाजनांचा खडसेंवर जोरदार हल्ला, ''विझलेल्या दिव्याबद्दल...''

मुंबई तक

07 Apr 2024 (अपडेटेड: 07 Apr 2024, 10:10 PM)

Girish Mahajan Criticize Eknath Khadse : ''माझा त्यांच्या प्रवेशाला विरोध नाही. ते म्हणतात माझी पोहचवरती एक दोन नंबरला आहे, पंतप्रधानांकडे आहे, अमित भाईंकडे आहे. तर मला वाटतं मी विरोध करणार नाही.नेहमी नेहमी ते सांगतायेत काल पण त्यांनी सांगितलं, प्रवेश होतोय म्हणून त्यांची हॉट लाइन आहे ते मोठे नेते आहेत त्यामुळे खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत.

lok sabha election 2024 girish mahajan criticize eknath khadse joining bjp sanjay raut maharashtra politics

एकनाथ खडसेकडे काय राहिले आहे, तो दिवा विझलेला आहे.

follow google news

Girish Mahajan Criticize Eknath Khadse : ज्ञानेश्वर पाटील,  हिंगोली :   अहो, त्यांना 7 लोकांची ग्रामपंचायत देखील राखता आली नाही. त्यांच्या पत्नी सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पडल्या. आमदारकीमध्ये सुद्धा त्यांची मुलगी पडली. बँक होती ती सुद्धा त्यांच्या हातातून गेली. त्यांच्याकडे काय राहिले आहे, जो दिवा विझलेला आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारला, असे म्हणत भापज नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (lok sabha election 2024 girish mahajan criticize eknath khadse joining bjp sanjay raut maharashtra politics) 
 
भाजपचे प्रमुख पदाधिकारी किंवा नेत्यांनी फॉर्म भरून ठेवले होते. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आलो होतो. पुढे रामदासजी त्यांच्याकडे पण आम्ही चाललो. योगी श्याम भारती महाराज यांचे आणि आमची बराच वेळ चर्चा झाली. मागील अनेक दिवसापासून ते काम करतायेत, त्यांचा परिवार खूप मोठा आहे, त्यांचे फॉलोवर्स मोठ्या संख्येमध्ये आहेत. आणि त्यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती.परंतु,ही जागा शिवसेनेकडे आहे यात कुठलाही बदल झाला नाही. फक्त उमेदवार बदललाय  परंतु शिवसेनेची ही जागा असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ शकत नाहीत. ही जागा भाजपकडे असती तर आम्ही निश्चित त्यांचा विचार केला असता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Archana Patil : ''मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू?''

मात्र आपण एकाच विचाराचे आहोत.त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मताचा विभाजन होऊ नये. एक एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे. सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि विचार करून ते त्यांचा निर्णय देणार आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

एकनाथ खडसे भापजात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले,  ''माझा त्यांच्या प्रवेशाला विरोध नाही. ते म्हणतात माझी पोहचवरती एक दोन नंबरला आहे, पंतप्रधानांकडे आहे, अमित भाईंकडे आहे. तर मला वाटतं मी विरोध करणार नाही.नेहमी नेहमी ते सांगतायेत काल पण त्यांनी सांगितलं, प्रवेश होतोय म्हणून त्यांची हॉट लाइन आहे ते मोठे नेते आहेत त्यामुळे खालच्या लोकांशी ते बोलत नाहीत, असा चिमटा देखील महाजन यांनी खडसेंना काढला. 

हे ही वाचा : "डॉक्टर नसलो तरी, गळ्याचे, कमरेचे पट्टे काढले", शिंदेंचे ठाकरेंवर 'बाण'

संजय राऊतांना दिलं आव्हान 

गिरीश महाजन यांनी यावेळी संजय राऊतांना आव्हान दिलं आहे. संजय राऊत यांना सांगा, तुम्हाला माझा चॅलेंज आहे. सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा, एका एका जागेवर पाच लाखाच्यावर लीड देईल, मागच्या वेळेस लोकसभा मतदारसंघांमध्ये 4 लाख 65 हजाराचे लीड होती.यावेळेस 5 लाखाहून अधिक लीड दिली जाणार आहे. मी तुमच्यासारखा असा घर कोंबडा नेता नाही मी बाग देणारा कोंबडा नाही. घरात बसून असा आरड ओरड मारत बसत नाही, अशी टीका देखील महाजन यांनी राऊतांवर केली. 
 

    follow whatsapp