रामटेक (महाराष्ट्र): लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (10 एप्रिल) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर घणाघाती हल्ला चढवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवले. असं म्हणत यावेळी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीला एकही जागा देऊ नका, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (lok sabha election 2024 maha vikas aghadi should not elect only one candidate from maharashtra says prime minister modi)
ADVERTISEMENT
पाहा रामटेकच्या सभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले..
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुमचा हा उत्साह संदेश देत आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार... तुम्हाला फक्त एकच खासदार निवडून आणण्याची गरज नाही, पुढची एक हजार वर्षे भारताचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्हाला मतदान करायचे आहे. तुम्हाला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करावे लागेल...'
'आजकाल निवडणुकांबाबत सातत्याने सर्वेक्षणे दाखवणारी माध्यमे या सर्वेक्षणात एनडीएचा बंपर विजय दाखवत आहेत... जेव्हा मोदींवर टीका होते तेव्हा समजून जा की, पुन्हा एकदा मोदी सरकार...'
'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र संविधानाचा खरा आत्मा आहे, पण घराणेशाही पक्षांनी नेहमीच संविधानाच्या या भावनेचा अपमान केला आहे.' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हे ही वाचा>> Lok Sabha election 2024 : शरद पवारांनी सातारा, रावेरच्या उमेदवारांची केली घोषणा
'हे लोक सामाजिक न्यायाबाबत खोटे बोलून स्वतःच्या कुटुंबाला प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्या राजवटीत अनेक दशकांपासून एससी, एसटी आणि ओबीसी कुटुंबांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले होते. गरिबांच्या काळजाचा ठोका कमी करून त्यांना सुविधा देण्याचे काम या गरिबांच्या मुलाने केले आहे...'
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, '...मी गेल्या 10 वर्षात जे काम केले आहे ते फक्त appetizer आहे, थाळी अजून येणे बाकी आहे... मी तुम्हाला हमी देतो - 'प्रत्येक क्षण देशाच्या नावावर आहे. प्रत्येक क्षण तुमच्या नावावर आहे.''
दरम्यान, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी विकसित भारत घडवत आहेत... त्यामुळेच आता प्रत्येक घरात मोदी नाही तर आता प्रत्येक मनात मोदी आहे. मोदी आहेत आणि हे संपूर्ण देशात दिसत आहे.'
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास, या मंत्राने आम्ही काम केले आहे... जे काँग्रेस 60 वर्षांत करू शकले नाही, ते पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 10 वर्षांत भारताचे चित्र बदलले. आहे... पंतप्रधान मोदींनी भारताला समृद्ध, समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्याचे वचन दिले आहे. त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याची भाषा केली आहे...'
हे ही वाचा>> Lok Sabha election : माढ्यात भाजपला बसणार जबर झटका? पवारांचा उमेदवार ठरणार!
दरम्यान, या प्रचार सभेत मंचावर रामटेकचे उमेदवार राजू पारवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले हे उपस्थित होते.
ADVERTISEMENT