Lok Sabha election 2024 Maharashtra Latest Update : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील प्रचाराचा पारा चढू लागला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही लोकसभेच्या जागावाटपाचा घोळ सुटलेला नाही. या संदर्भातील सर्व माहिती आणि घडामोडींचे अपडेट्स...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:03 PM • 15 Apr 2024विशाल पाटील अपक्ष लढणार, सांगलीतून उमेदवारी अर्ज दाखल!
विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याकडून सांगलीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
- 03:46 PM • 15 Apr 2024राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसणार, IMD चा अंदाज!
यावर्षी 106 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाने माहिती दिली आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, 'यंदा सामान्यहून अधिक पाऊसाचा अंदाज आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 106 टक्के पाऊसाचा अंदाज आहे. यंदा सामान्य पेक्षा चांगली परिस्थिती आहे. 8 जून पर्यंत मान्सून येण्याची स्थिती आहे. अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपला असेल. अल निनो चा प्रभाव कमी होतो आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे. दरम्यान हा भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे.'
- 02:30 PM • 15 Apr 2024Baramati Lok Sabha : इंदापूरमध्ये अजित पवार गटात उभी फूट
अप्पासाहेब जगदाळे अजित पवार गटातील शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अप्पासाहेब जगदाळे, दत्तात्रय भरणे व आमदार यशवंत माने यांनी इंदापूर मार्केट कमिटीची निवडणूक लढवली होती.
अप्पासाहेब जगदाळे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. पण, आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याने हा अजित पवार गटासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे सुनेत्रा पवार यांना इंदापूरमध्ये फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे. - 02:16 PM • 15 Apr 2024हातकणंगलेत आमदार प्रकाश आवाडेंची नाराजी दूर!
हातकणंगलेत आमदार प्रकाश आवाडेंचे बंड अखेर थंड झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यस्थी यशस्वी झाली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंना दिलासा मिळाला आहे. ते मानेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही उपस्थित होते.
- 12:21 PM • 15 Apr 2024Lok Sabha Election : प्रकाश आंबेडकरांनी प्रसिद्ध केला वंचितचा जाहीरनामा, कोणते मुद्दे?
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांची माहिती दिली.
वंचितच्या जाहीरनाम्यातील मुद्दे
- एनआरसी, सीएए कायदा असंवैधानिक असल्याने त्याला विरोध.
- या कायद्यांमुळे हिंदूतील भटक्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.
- शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा केला जाईल़. याचं उल्लंघन करणाऱ्यांना आर्थिक दंड आणि गुन्हा दाखल करू.
- शिक्षणाच्या धोरणाला कथित शिक्षण महर्षींच्या कैदेतून मुक्त करू.
- शिक्षणासाठीची तरतूद 3 टक्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत वाढवू.
- सार्वजनिक क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि विक्री थांबवू.
- शेतीवर आधारीत उद्योगांना चालना देणार.
- नवा आंत्रप्र्युनर क्लास वाढवणार
- कापूस, सोयाबीनला बाजारभाव मिळत नाही. सत्तेत आलो तर कापसाला किमान 9 हजार तर सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव देऊ.
- शेतीला उद्योगाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू.
- समान नागरी कायदा संविधानासाठी धोकादायक नाही, तर संघासाठी आहे.
- या कायद्यामुळे धर्मावर राजकारण करणाऱ्या पक्षांवर प्रभाव पडेल. - 09:27 AM • 15 Apr 2024BJP Lok Sabha : माढ्यासाठी भाजपची धावपळ! तीन नेते विशेष विमानाने नागपूरला
धर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे माढ्यात हालचालींना वेग.. धनगर नेते उत्तमराव जानकर, आमदार जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील विशेष विमानाने नागपूरकडे रवाना..
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी (१४ एप्रिल) शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ते माढा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललून गेली आहेत. त्यामुळे भाजपला सेफ वाटत असलेल्या मतदारसंघात तटबंदी ढासळल्याचे चित्र आहे.
त्यामुळे ही बदललेली समीकरणे पुन्हा जुळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. आता नाराज असलेले माढा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांची भाजपकडून समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
त्यासाठी बारामती येथे विशेष विमान पाठवून उत्तम जानकर यांच्यासह शाहाजी बापू पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांना तातडीने नागपूरला येण्याचे निमंत्रण पाठवले गेले. त्यानुसार आज सकाळी तिन्ही रवाना झाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांशी बोलून आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे उत्तम जानकर आता महायुतीसोबत राहतात की मोहिते पाटील यांना ताकद देतात, हे बघावं लागेल.
- 09:18 AM • 15 Apr 2024Lok Sabha election : रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी?
महायुतीमध्ये ज्या जागांवरून तिढा निर्माण झाला आहे, त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातून लोकसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे ते या जागेसाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. किरण सामंत यांनी नागपूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आहे.
दरम्यान, 'लोकसत्ता'ने यासंदर्भात एक वृत्त दिले असून, शिंदेंच्या शिवसेनेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी देण्याचा प्रस्ताव भाजपकडून दिला गेला आहे. किरण सामंत यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा हा प्रस्ताव असला, तरी दोन्ही पक्षांकडून याबद्दल काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.
किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी म्हटलं की, "उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेविषयी चर्चा झाली. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लढवण्यास मी इच्छुक आहे. नारायण राणेंनी आधी स्वतःहून उमेदवारी नाकारली होती. ते आता इच्छुक आहेत. मात्र, मी त्या जागेचा प्रबळ दावेदार आहे. राणेंनीही मला काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद दिला होता."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT