Maharashtra Lok Sabha Election Live Update : लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी निकालाची उत्सुकता वाढत आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल हा 4 जूनला जाहीर होणार आहे. तर, एक्झिट पोलचे निकाल काल १ जून रोजी संध्याकाळी समोर आले. हे अंतिम निकाल नाहीत, परंतु निकालाचे अंदाज स्पष्ट करत आहेत.
अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 04:44 PM • 02 Jun 2024Maharashtra News : 'मविआला राज्यात 32 जागा मिळतील'- पृथ्वीराज चव्हाण
'महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. तसंच, कुणाचं सरकार बनणार हे 4 तारखेला कळेल.' एक्झिट पोलच्या अंदाजावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- 04:05 PM • 02 Jun 2024Maharashtra News : महाराष्ट्रात यंदा 99% पाऊस बरसण्याची शक्यता!
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झालं असून महाराष्ट्रात पावसाचे आगमन देखील लवकर होणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात 99% पाऊस बरसेल.
- 03:57 PM • 02 Jun 2024Maharashtra News : 'अबकी बार मोदी सरकार आणि चारशे पार'- भागवत कराड
'प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा सरकार बनणार आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार हे स्पष्ट झालेले आहे. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन झाले होते त्यावेळी आम्ही नारा दिला होता, अबकी बार मोदी सरकार आणि चारशे पार,' असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले.
- 01:56 PM • 02 Jun 2024Pune Accident : शिवानी आणि विशाल अग्रवाल यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीने आरोपीची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने अग्रवाल दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
- 01:47 PM • 02 Jun 2024Maharashtra News : पुणे अपघातप्रकरणी शिवानी आणि विशाल अग्रवाल यांना कोर्टात करणार हजर
पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी आज शिवानी अगरवाल आणि विशाल अगरवाल या दोघांना पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहेत. थोड्याच वेळात पुणे पोलीस दोघांना घेऊन कोर्टात येतील. ब्लड सॅम्पलमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी दोघं अटकेत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- 01:42 PM • 02 Jun 2024Maharashtra News : संजय जाधव यांचे मोठे विधान
परभणीची जागा शिवसेना (UBT) जिंकेल याबाबत कोणाच्या मनात शंका नाही, परभणी जिल्हा आजही शिवसेनेच्या पाठीमागे आहे. शिवसेनेला मान्यता मिळून देणारा परभणी जिल्हा आहे, असे संजय जाधव यांनी म्हटले आहे.
- 12:56 PM • 02 Jun 2024Lok Sabha Election 2024 : एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड, संजय राऊतांची टीका!
'एक्झिट पोल अत्यंत फ्रॉड आहे. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील. हा आकडा लोकांनी दिलेला कौल आहे. मविआच्या राज्यात 35 जागांवर निवडून येईल. राज्यात ठाकरे गटाचा 18 जागांचा आकडा कायम राहिल. कालच्या एक्झिट पोलमध्ये ठरवून दिलेले आकडे आहेत. सर्व मिळून भाजपला 800 -900 जागा देतील असं वाटत होतं.' अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.
- 12:30 PM • 02 Jun 2024Maharashtra News : नाशिकमध्ये ठाकरे गटाची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
नाशिकमध्ये ठाकरे गटाची कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. उमेदवार प्रतिनिधींना मतमोजणीसंदर्भात मार्गदर्शन करतील. मतमोजणी दरम्यान गैरप्रकार आढळल्यास त्वरित अक्षेप घ्यावा अशा सूचना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
- 09:55 AM • 02 Jun 2024Maharashtra news : काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार?
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपचा आरोप आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तक्रारदार शरद कांबळे यांना पोलिसांनी म्हणणे मांडण्यासाठी बोलावलं आहे.
- 09:33 AM • 02 Jun 2024mumbai local news : एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही- रविकांत तुपकर
'एक्झिट पोलच्या अंदाजावर विश्वास नाही', असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं आहे. 'निकाल आमच्या बाजूने लागणार', असं देखील तुपकर म्हणाले. तुपकरांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
- 09:27 AM • 02 Jun 2024mumbai local news : मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार
Central Railway Megablock : मध्य रेल्वेने जाहीर केलेला CSMT ते ठाणे दरम्यानचा 63 तासांचा मेगा ब्लॉक आज संपणार आहे. दुपारी 12:30 वाजता CSMT स्थानकावराचा ब्लॉक संपुष्टात येणार आहे.. CSMT ते ठाणे या मार्गावर दुपारी 3 नंतर लोकल सेवा नियमितपणे पुरवली जाणार आहे..
- 09:17 AM • 02 Jun 2024Maharashtra news : 'एक्झिट पोलवर विश्वास नाही'- बच्चू कडू
Bacchu Kadu On Exit Poll : 'एक्झिट पोलवर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोलवर मला विश्वास नाही, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत. अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब जिंकणार असल्याचा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.' कालच्या एक्झिच पोलमध्ये भाजपच्या नवनीत राणा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे आता चार तारखेला निकाल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT