Maharashtra News Live Updates : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या सांगता सभा आज (4 मे 2024, शनिवार) होणार आहेत. यामध्ये खासदार शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही हजर राहणार आहेत. महाविकास आघाडीची सांगता सभा खासदार शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे, तर महायुतीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालीम संघाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 09:25 PM • 04 May 2024साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत असताना उद्योगधंदे बाहेर का गेले? राज ठाकरेंची टीका
नारायण राणेंना माझी आवश्यकता नाही. ते असेही निवडून आलेत समजा.
राज्यातील 9 भारतरत्नापैकी 7 भारतरत्न कोकणातला मिळाले आहेत.2014,2019 दरम्यान ज्या गोष्टी घडल्या त्याला जाहिर विरोध केला. मग नोटबंदी, असो पुतळ्यांची असेल, ज्या गोष्टी पटल्या त्याच कौतुक केलं.
मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून मी विरोध, मला भूमिका नाही पटली म्हणून विरोध केला.यांच्यासारखं नव्हतं बदल्यात काही मिळालं नाही म्हणून विरोध केला.
अडीच अडीच, त्यावेळेला भाजपने अडीच वर्ष मान्य केले असते. तर आज तुम्ही बोलताय ते बोलला असतात. कारण सत्तेचा बोळा कोंबला असता तुमच्या तोंडात.
साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होता, सत्तेत असताना उद्योगधंदे बाहेर का गेले?
- 08:51 PM • 04 May 2024ठाकरेंचा PM मोदींना सणसणीतला टोला, ''तुम्ही संकट म्हणून...''
मोदींनी एक मुलाखत दिली, पाहिली तुम्ही, मी नाही पाहिली, मला अनेकांनी मेसेज केलं मोदींना तुमच्यावर प्रेम आलंय.
मोदींना माझ्यावर प्रेम उतू आलाय. तुम्ही माझी इतकी चौकशी करत होतात. तुम्ही जी चौकशी करत होतात, ती तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हती का? तुमचे चेलेचपाटे काय करत होती. मोदीजी तुमच्यावर जरी संकट आलं तर मी धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्र आणि देशावरती आलात.तुमचा तुम्ही स्वत:ला आवर घाला, असा टोला ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला. - 06:39 PM • 04 May 2024पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत दोन सभा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत. येत्या 15 व 17 मे रोजी मुंबईत या सभा पार पडणार आहेत. या सभेचे वेळ आणि ठिकाण अद्याप ठरलं नाही आहे.. मात्र एक शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे, इतकं निश्चित आहे
- 03:48 PM • 04 May 2024उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ
लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
- 01:48 PM • 04 May 2024प्रणिती शिंदेंची भाजपावर जोरदार टीका
भाजपने दहा वर्षात तुमच्या मतांचा वापर केला आणि सत्तेची मजा लुटली. मी तुमची बहीण या नात्याने सांगते तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही, असे प्रणिती शिंदे हिने म्हटले आहे.
- 01:01 PM • 04 May 2024राज ठाकरेंना सभेसाठी विनंती केली आणि त्यांनी मान्य केली- नारायण राणे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी कणकवली येथे सभा होणार आहे. मी सभेसाठी विनंती केली आणि त्यांनी मान्य केली असं राणे म्हणाले आहेत.
- 10:28 AM • 04 May 2024अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही अर्ज दाखल
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेरच्या दिवशी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्या पत्नी सुप्रिया अमोल कीर्तीकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- 09:03 AM • 04 May 2024प्रवाशांचे होणार हाल! मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी, 5 मे 2024 रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी -वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही
- 08:53 AM • 04 May 2024महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंची आज पहिली प्रचार सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोकणात येत आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ ते आज सभा घेणार आहेत. कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरच्या मैदानावर सभा आहे. राज ठाकरे यांच्याकडून महायुतीच्या उमेदवारासाठी घेतलेली ही पहिली प्रचार सभा ठरेल.
- 08:49 AM • 04 May 2024कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय
केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदीमुळे शेतकरी नाराज होते. यामुळे आता 40 टक्के निर्यात शुल्क लावून निर्यात करता येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT