Maharashtra Lok Sabha Election Phase 1 Voting Live : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज (19 एप्रिल) होत आहे. महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघासह देशातील १०२ जागांसाठी हे मतदान होत आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर (Nagpur Lok Sabha), चंद्रपूर वणी अर्णी लोकसभा (Chandrapur Lok Sabha), भंडारा-गोंदिया (Bhandara Gondia Lok Sabha), रामटेक (Ramtek Lok Sabh) आणि गडचिरोली-चिमूर (Gadchiroli-chimur Lok Sabh) या मतदारसंघातही मतदान होत आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील मतदारसंघातील प्रचारानेही जोर धरला आहे. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:53 PM • 19 Apr 2024विदर्भातील पाच मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 54.85% मतदान!
- रामटेक ५२. ३८ टक्के
- नागपूर ४७. ९१ टक्के
- भंडारा- गोंदिया ५६ .८७ टक्के
- गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के
- आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.
- 04:27 PM • 19 Apr 2024गडचिरोली-चिमूर मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?
अहेरी विधानसभा- 62.80
आमगाव विधानसभा- 54.38
आरमोरी विधानसभा- 56.00
ब्रम्हपुरी विधानसभा- 45.58
चिमूर विधानसभा- 60.36
गडचिरोली विधानसभा- 65.30
- 04:00 PM • 19 Apr 2024Maharashtra Lok Sabha Election 2024: दुपारी 3 वाजेपर्यत किती टक्के मतदान?
- नागपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.43 टक्के मतदान
- रामटेक लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के मतदान
- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.88 टक्के मतदान
- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 55.79 टक्के मतदान
- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांमध्ये मिळून दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण 44.12 टक्के मतदान झालं आहे.
- 03:55 PM • 19 Apr 2024पाहा देशातील कोणकोणत्या राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत किती झालं मतदान
- 03:30 PM • 19 Apr 2024'नाशिकमधून लढण्यास माझी माघार!'- छगन भुजबळ
'नाशिकच्या जागेसंदर्भात शहांसोबत दिल्लीत चर्चा झाली. छगन भुजबळ नाशकातून लढणार शाहांनी सांगितलं. अजित पवारांनी समीर भुजबळांचं नाव सुचवलं होतं. फडणवीस देखील म्हणाले तुम्हालाच उभं राहायला सांगितलंय. आम्हाला सांगितल्यानुसार आम्ही तयारीला लागलो होतो. मविआच्या उमेदवाराचा नाशकात प्रचार सुरू झाला आहे. नाशिकचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीये. नाशिकसंदर्भात ताबडतोब निर्णय झाला पाहिजे. नाशकातून मी लढणार नाही, माझी माघार आहे. मोदी शाहांनी माझं नाव सूचवलं त्यासाठी त्यांचे आभार आहेत.'
- 02:24 PM • 19 Apr 2024पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत एवढे टक्के मतदान
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: नागपूर विभागातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये दुपारी 1.00 वाजेपर्यंत एकूण 32.36 टक्के मतदान झालं.
मतदारसंघानुसार दुपारी 1 वाजेपर्यंतचे मतदान
- नागपूर: 28.75 टक्के मतदान
- चंद्रपूर: 30.96 टक्के मतदान
- रामटेक: 28.73 टक्के मतदान
- भंडारा गोंदिया: 34.56 टक्के मतदान
- गडचिरोली-चिमूर: 41.01 टक्के मतदान
- 01:55 PM • 19 Apr 2024मतदान केंद्रात साप आढळल्याने उडाला गोंधळ!
नागपूरात आज डीके महाविद्यालयातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान कक्ष क्रमांक 5 च्या बाहेर साप आल्याने गोंधळ उडाला होता. मतदान कक्षाच्या बाहेरील हिरवळीमध्ये 2.5 फूट लांबीचा विषारी साप आढळून आल्याने मतदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सापाला पकडून जंगलात सोडण्यात आले.
- 01:40 PM • 19 Apr 2024दुपारी 1 वाजेपर्यंतची आकडेवारी, कुठे किती टक्के मतदान?
भंडारा गोंदिया : ३४.५६%
चंद्रपूर : ३०.९६ %
गडचिरोली-चिमुर : ४१.०१ %
नागपूर : २८.७५ %
रामटेक : २८.७३ % - 01:29 PM • 19 Apr 2024'महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी..'- आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी आज दाखल करण्यात आला आहे. युवानेते आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. खास वाकचौरेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदीत्य ठाकरे हजर राहीले. यावेळी त्यांनी सांगली आणि रत्नागिरीच्या जागेविषयी बोलत महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते अशी टीका केली.
- 12:45 PM • 19 Apr 2024सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी, कुठे किती टक्के मतदान?
-
भंडार-गोंदिया - 19.72% मतदान
-
चंद्रपूर - 18.94% मतदान
-
गडचिरोली चिमूर - 24. 88% मतदान
-
नागपूर - 17.53% मतदान
-
रामटेक - 16.14% मतदान
-
- 11:28 AM • 19 Apr 2024पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात पहिल्या दोन तासात 7.28 टक्के मतदान!
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालं आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 7.28 टक्के मतदान झालं आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
- रामटेक- 5.82%
- नागपूर- 7.73%
- भंडारा- गोंदिया- 7.22 %
- गडचिरोली- चिमूर- 8.43%
- चंद्रपूर- 7.44%
- 11:07 AM • 19 Apr 2024मी चांगल्या फरकाने जिंकेन असा मला 101% विश्वास - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री आणि नागपुरातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी म्हणाले, 'आपण आज लोकशाहीचा सण साजरा करत आहोत. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. हा आपला मूलभूत अधिकार आणि कर्तव्यही आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता, पण तुमचं मत देणं महत्त्वाचं आहे. मला 101% विश्वास आहे की मी चांगल्या फरकाने जिंकेन.'
- 11:01 AM • 19 Apr 2024मतदानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन!
'लोकशाहीचा महोत्सव चालला आहे, मी आणि माझ्या कुटुंबाने.. मी माझ्या पत्नीने आणि माझ्या आईने आम्ही सगळ्यांनी मतदान केलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सम्मिलीत व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं.. अशा प्रकारचं आवाहन मी करतो.' अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
- 10:34 AM • 19 Apr 2024Lok Sabha Election 2024: विदर्भात पहिल्या टप्प्यातील लढत कशी असणार?
नागपूर - भाजपचे नितीन गडकरी vs काँग्रेसचे विकास ठाकरे
चंद्रपूर- भाजपचे सुधीर मुनगंटीवार vs काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर
रामटेक - काँग्रेस श्यामकुमार बर्वे vs शिवसेनेचे राजू पारवे आणि वंचितचे किशोर गजभिये
गडचिरोली-चिमूर - काँग्रेस नामदेव किरसान vs भाजप अशोक नेते आणि वंचितचे हितेश मडावी
भंडारा-गोंदिया- भाजपचे उमेदवार सुनील मेंढे vs काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे आणि वंचितचे संजय केवट
- 10:07 AM • 19 Apr 2024Maharashtra Lok Sabha Voting Live News : गडचिरोलीत दोन तासांत 8.43 टक्के मतदान
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासांत 8.43 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान 12 टक्के गडचिरोली विधानसभा मतदारसंघात झाले आहे.
- 09:53 AM • 19 Apr 2024Maharashtra Voting Live Updates : गडचिरोलीत ईव्हीएममध्ये बिघाड
गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला. कुरखेड्यात ईव्हीएम बिघडल्याने दोन तास मतदान थांबलं. दुसऱ्या नवीन ईव्हीएममध्येही अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
- 09:37 AM • 19 Apr 2024Maharashtra Voting Live updates : चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले मतदान
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर त्यांनी पोस्ट करून मतदानाचा आवाहन केले आहे.
- 08:25 AM • 19 Apr 2024राजू पारवेंनी केलं मतदान
रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले महायुतीचे (शिवसेना) उमेदवार राजू पारवे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी उमरेड येथील मतदान केंद्रावर मतदानाचे कर्तव्य पार पाडले.
- 08:22 AM • 19 Apr 2024Gadchiroli Chimur Lok Sabha Voting Updates : मतदार केंद्राबाहेर लागल्या रांगा
-गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात 950 मतदान केंद्रापैकी 361 मतदान केंद्र नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागात आहेत.
- सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
- मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागरिकांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत.
- भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी थेट लढत आहे.
- मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात 72 टक्के मतदान झाले होते.
- यंदा शाळा- महाविद्यालयात जनजागृती व मतदान सेल्फी आकर्षक बक्षीस योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न केले आहेत.
- जिल्ह्यात मतदान शांततेत होण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
- सीआरपीएफ, बीएसएफ एसआरपीएफ आणि होमगार्ड पथक मतदान केंद्रावर तैनात केले आहेत.
- नक्षल्याकडून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नक्षलग्रस्त भागातील जंगलात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन केले गेले.
- 07:56 AM • 19 Apr 2024Maharashtra Voting live updates : मोदींचे मतदारांना आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशातील मतदारांना मताधिकार बजावण्याचे आवाहने केले आहे.
"लोकशाहीचा सर्वात मोठा सण आजपासून सुरू होत आहे! लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघातील मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा."
"पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना माझे विशेष आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. लोकशाहीत प्रत्येक मत मौल्यवान असते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!", असे मोदींनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT