Marathi News Live Updates : शरद पवार गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज दुपारी चार वाजता जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं असेल. महाविकास आघाडीत शरद गटाच्या वाट्याला 10 जागा आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज शरद पवार गट किती जागा जाहीर करणार आणि कोणते उमेदवार देणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे आणि नगरमधून नीलेश लंके यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:50 PM • 30 Mar 2024बारामतीत पवार विरूद्ध पवार लढत होणार, सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर
बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे. कारण शरद पवारांनी नुकतीच बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे.
- 05:27 PM • 30 Mar 2024शरद पवार गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीतून (शरद पवार) 5 उमेदवारांची नावं जाहीर
वर्धा- अमर काळे
दिंडोरी- भास्करराव भगरे
बारामती-सुप्रिया सुळे
शिरुर- डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके - 05:07 PM • 30 Mar 2024LIVE : शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेला सुरूवात!
थोड्याच वेळात शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा शरद पवार गटाचा आरोप आहे. सार्वजनिक पदांवरील नेत्यांची नावे यादीत टाकल्याने आक्षेप आहे. लोकप्रतिनीधी कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा शरद पवार गटाचा दावा आहे. शरद पवार गटाकडून शिवसेना, भाजपविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतील काही नेत्यांच्या नावांना आक्षेप आहे. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
- 04:34 PM • 30 Mar 2024चाकूरकरांच्या निमित्ताने मराठवाड्यात उत्तम नेतृत्त्व मिळालं- फडणवीस
"अर्चना चाकूरकरांनी राजकारणात यावं, हे आम्ही गेल्या पाच-सहा वर्षांपासून सांगत होतो. मोदींच्या विकासकामातून प्रेरणा मिळाल्याने चाकूरकरांनी भाजपाच प्रवेश केला. चाकूरकरांच्या निमित्ताने मराठवाड्यात उत्तम नेतृत्त्व मिळालं आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- 01:52 PM • 30 Mar 2024'पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय'- विजय शिवतारे
'पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बारामतीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. गुंजवणीचं पाणी पुरंदरला देणार असल्याचं सीएम, डीसीएमचं आश्वासन आहे. मी माघार घेत नसल्यानं शिंदे माझ्यावर रागावले होते. माझ्या भूमिकेने शिंदेंची अडचण होतेय असं सांगण्यात आलं. शिंदे, फडणवीसांशी चर्चा झाली तरी मी माघार घ्याला तयार नव्हतो. माझ्यामुळे 15-20 खासदार पडतील असं सांगण्यात आलं. शिंदेंच्या ओएसडींनी मला फोनवर सांगितलं. ' असं शिवतारे पत्रकार परिषदेत म्हणाले.
- 01:08 PM • 30 Mar 2024'का बिचाऱ्या अंबादास दानवेंना...', अंबादास दानवेंच्या पक्षप्रवेशाबाबत फडणवीस काय म्हणाले?
अंबादास दानवे हे भाजपमध्ये जाऊन संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असं ते म्हणाले. यावेळी मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. अंबादास दानवेशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांच्या प्रवेशाची चर्चा नाही. का बिचाऱ्या अंबादास दानवेंना परेशान करत आहात? असं ते म्हणाले.
- 12:38 PM • 30 Mar 2024मेट्रो तीन प्रकल्पासाठी मुंबईतील काही रस्ते राहणार बंद
मरोळ-मरोशी मार्गावरील मेट्रो तीन प्रकल्पासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या अंतर्गत मरोळ नाका स्टेशनच्या अंतर्गत कामासाठी मरोळ फायरब्रिगेड कंपाऊंडमधील जागेतील मरोळ नाक्यापासून लोकभारती जंक्शनकडे जाणारा रस्ता, तसेच आश्विन हॉटेलपासून मरोळ नाक्याकडे जाणारा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहणार आहे; तर अंधेरी कुर्ला रोडपासून मकवाना रोडवरही वाहनांच्या वाहतुकीवर प्रवेश बंदी आहे.
- 12:37 PM • 30 Mar 2024छत्रपतींच्या विचारावर जर सगळे चालले तर देशाची अखंडतता कायम आबादित राहील
छत्रपतींचे विचार केवळ मनात धरून चालणार नाही ते आचरणात आणले पाहिजेत अशा प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी प्रसिद्ध असणारी बगाड यात्रेमध्ये उदयनराजे भोसले भेट देण्यासाठी आले होते
सध्या जातीपातीच्या राजकारण सुरू असतानाच प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजेत पाची बोटं समान नसतात त्यामुळे हा विचार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे - 12:05 PM • 30 Mar 2024काँग्रेसला धक्का, अर्चना चाकूरकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश!
माजी मंत्री, काँग्रेस नेते शिवराज चाकूरकरांच्या सूनबाई अर्चना चाकूरकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. लातूरमध्ये भाजपकडून काँग्रेसला धक्का बसला आहे.
- 11:44 AM • 30 Mar 2024'याचना नहीं अब रण होंगा..', अंबादास दानवेंची गोंधळात टाकणारी पोस्ट!
कालपासून शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आज पत्रकार परिषदेतून त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आहे. 'माझ्या पक्षप्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. मी सच्चा शिवसैनिक, साहेबांच्या नेतृत्त्वात काम करणार. मी काम करणारा शिवसैनिक आहे. नाराज असलं म्हणजे पक्ष सोडतात का? पक्षाचा प्रचार करण्यासाठी मी उतरलो आहे. आमचा स्वतंत्र पक्ष वेगळा बाणा आहे. भाजपसारखे विचार असले म्हणजे आम्ही एक झालो का? आठवडाभरात 90 गावांचा दौरा केला. चंद्रकांत खैरे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत.' असं म्हणत अंबादास दानवेंनी पक्षात राहाण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
- 11:17 AM • 30 Mar 2024नांदेड लोकसभेसाठी २५ जण इच्छुक.. निरीक्षकाच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्यावतीने बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हयातील २५ समाज बांधव लोकसभा लढविण्यासाठी इच्छा व्यक्त करत निरीक्षकाकडे आपली नावे दिली. प्रत्येक जिल्ह्यात एक उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला होता. त्यानुसार निरीक्षक म्हणून सुभाष जावळे हे नांदेडला आले होते. मराठा बांधवाची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. जवळपास तीन तास ही बैठक चालली. यात ५० टक्के समाज बांधव निवडणूक लढविण्याच्या बाजूने तर, ५० टक्के बांधवांनी नकार व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान, हा अहवाल ३० मार्च रोजी मनोज जरांगे यांना दिला जाणार असून ते पुढील भुमिका स्पष्ट करणार आहेत. अशी माहिती निरीक्षक सुभाष जावळे यांनी दिली.
- 11:16 AM • 30 Mar 2024भाजपा नेत्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे बीड दौऱ्यावर
बीड शहरातील व्यापारी तसेच काही ठिकाणी वैयक्तिक गाठीभेटी देणार आहेत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊन पंधरा दिवस झाले आहेत यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या गाठीभेटी दौरा केला आहे त्यांनी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन आशीर्वाद घेतले आहेत आज पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावरती असून त्या बीड शहरातील व्यापारी बांधव तसेच काही वैयक्तिक गाठीभेटी देखील घेणार आहेत.
- 10:56 AM • 30 Mar 2024रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. ३१) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
- 10:24 AM • 30 Mar 2024आज एका बड्या नेत्याचा भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश?
भाजपमध्ये आज एका बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. आज साडेदहा वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT