Maharashtra Lok Sabha Election Live : Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

मुंबई तक

13 May 2024 (अपडेटेड: 13 May 2024, 06:59 PM)

Maharashtra News Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह एकूण 96 जागांसाठी आज मतदान सुरु झालं आहे. अशाच इतर राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई Tak चा हा लाइव्ह ब्लॉग वाचा.

Mumbaitak
follow google news

Maharashtra News Live Updates : आज लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासह एकूण 96 जागांसाठी आज मतदान सुरु झालं आहे. चौथ्या टप्प्यात 8.73 कोटी महिलांसह 17.70 कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. मतदानासाठी 1.92 लाख मतदान केंद्रावर 19 लाखापेक्षा जास्त मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:56 PM • 13 May 2024
    Maharashtra voting Live: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 5 वाजेपर्यंत किती टक्के मतदान? 

    महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आज (13 मे) 52.49% मतदान 5 वाजेपर्यंत झालं आहे.

    • चौथ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 60.60% मतदान झाले.
    • जळगाव मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 51.98% मतदान झाले.
    • रावेर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55.36% मतदान झाले.
    • औरंगाबाद मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 54.02% मतदान झाले.
    • मावळ मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 46.03% मतदान झाले.
    • पुणे मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 44.90% मतदान झाले.
    • शिरूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 43.89% मतदान झाले.
    • अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 53.27% मतदान झाले.
    • शिर्डी मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 55.27% मतदान झाले.
    • बीड मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 58.21% मतदान झाले.
  • 05:43 PM • 13 May 2024
    Mumbai Rain: मुंबईत सुटलाय सोसाट्याचा वारा, बरसतायेत पावसाच्या धारा!

    आज मुंबई, ठाणेसह परिसरात हलका ते मध्यम तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि गारपीट यांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार आज दुपारी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी जोरदार वादळासह धुळीचे वादळ वाहू लागले. धुळीचे वादळ आणि पावसामुळे अनेक भागात दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. धुळीच्या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

  • 05:19 PM • 13 May 2024
    Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान? 

    आज (13 मे) महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात एकूण 42.35% मतदान झालं आहे.

    • चौथ्या टप्प्यात 3 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 49.91% मतदान झाले.
    • जळगाव मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 42.15% मतदान झाले.
    • रावेर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 45.26% मतदान झाले.
    • औरंगाबाद मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 43.76 % मतदान झाले.
    • मावळ मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 36.54% मतदान झाले.
    • पुणे मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 35.61% मतदान झाले.
    • शिरूर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 36.43% मतदान झाले.
    • अहमदनगर मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 41.35% मतदान झाले.
    • शिर्डी मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 44.87% मतदान झाले.
    • बीड मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 46.49% मतदान झाले.
  • 03:22 PM • 13 May 2024
    Maharashtra voting Live: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 1 वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

    महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघामध्ये मिळून दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85% टक्के एवढं मतदान झालं आहे.

    • चौथ्या टप्प्यात 1 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 37.33% मतदान झाले.
    • जळगाव मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 31.70% मतदान झाले.
    • रावेर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 32.02% मतदान झाले.
    • औरंगाबाद मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 32.37 % मतदान झाले.
    • मावळ मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 27.14% मतदान झाले.
    • पुणे मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 26.48% मतदान झाले.
    • शिरूर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 26.62% मतदान झाले.
    • अहमदनगर मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 29.45% मतदान झाले.
    • शिर्डी मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 30.49% मतदान झाले.
    • बीड मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 33.65% मतदान झाले.
  • 03:21 PM • 13 May 2024
    Lok Sabha Election 2024 : अंजनडोहमधील EVM मशीनमध्ये बिघाड
    छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. तब्बल एक तासापासून ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय. ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे एक तासापासून मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे. मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदार मतदान केंद्रातच बसून आहेत. एक तास बसून मतदान यंत्रात बिघाड झालाय.  
  • 03:20 PM • 13 May 2024
    Beed Live Updates : लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
    महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे समवेत विद्यमान खासदार प्रीतम मुंडे व दुसऱ्या भगिनी यशस्वी मुंडे हे देखील सोबत होत्या त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे   
  • 03:20 PM • 13 May 2024
    Beed Lok Sabha : मंत्री धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क
    चौथ्या टप्प्यात होत असलेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मूळ गावी नाथरा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.  
  • 03:19 PM • 13 May 2024
    Jalna Lok Sabha : जालन्यात तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा अधिकार
    जालन्यात 4 तृतीयपंथीयानी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावलाय. शहरातील गुरू गणेश भवन येथील मतदान केंद्रात तृतीयपंथी व्यक्तीनी मतदान केलंय. जालना लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत असून मतदान केंद्रावर रांगा लावत मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताय. त्याच अनुषंगाने आज जालना शहरातील 4 तृतीय पंथीयानी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावलाय. प्रत्येकाने घराबाहेर पडून स्वयं स्फूर्तीने मतदान करावं आणि लोकशाहीला मजबूत करावं असं आवाहन देखील तृतीयपंथी मतदारांनी केलंय.
  • 03:18 PM • 13 May 2024
    Live News Updates : CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर!

    सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डाने (CBSE Board) बारावीचा निकाल (12th Result 2024) जाहीर केला आहे. सोमवारी, 13 मे रोजी बारावीचा हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाचा 2024 चा बारावीचा निकाल 87.98 टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांना मागे टाकलं आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

  • 11:54 AM • 13 May 2024
    Baramati Lok Sabha : बारामतीत मोठी घटना! EVM ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही बंद

    बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मतदान पश्चात ईव्हीएम ठेवलेल्या गोडाऊनचे सीसीटीव्ही कॕमेरे बंद झाले आहेत. काळं बेर होण्याची सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिनिधीला भिती असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 11:49 AM • 13 May 2024
    Maharashtra News : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान? 

    महाराष्ट्रात एकूण 17.51% 

    • चौथ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 22.12% मतदान झाले.
    • जळगाव मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.89% मतदान झाले.
    • रावेर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 19.03% मतदान झाले.
    • औरंगाबाद मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 19.53 % मतदान झाले.
    • मावळ मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.87% मतदान झाले.
    • पुणे मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.16% मतदान झाले.
    • शिरूर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.51% मतदान झाले.
    • अहमदनगर मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 14.74% मतदान झाले.
    • शिर्डी मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 18.91% मतदान झाले.
    • बीड मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 16.62% मतदान झाले.
  • 10:40 AM • 13 May 2024
    Maharashtra News : पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन

    पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपचं आंदोलन, बुथ परिसरात काँग्रेसचे बॅनर असल्याने हेमंत रासने यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

     

  • 10:35 AM • 13 May 2024
    Lok Sabha Election 2024 : अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पोलिंग एजंटला मज्जाव केल्याप्रकरणी आणि एक व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्याबाबत ही तक्रार करण्यात आली आहे.

     

  • 09:59 AM • 13 May 2024
    Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यातील पहिल्या दोन तासात किती टक्के मतदान? 
    • चौथ्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 8.43% मतदान झाले.
    • जळगाव मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.14% मतदान झाले.
    • रावेर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.14% मतदान झाले.
    • औरंगाबाद मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 7.52 % मतदान झाले.
    • मावळ मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 5.38% मतदान झाले.
    • पुणे मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झाले.
    • शिरूर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 4.97% मतदान झाले.
    • अहमदनगर मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 5.13% मतदान झाले.
    • शिर्डी मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.83% मतदान झाले.
    • बीड मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 6.72% मतदान झाले.
  • 09:07 AM • 13 May 2024
    Maharashtra Lok Sabha voting : मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे- सुबोध भावे

    आयुष्यात जेव्हा पहिल्यांदा मतदान करायला मिळालं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून कुठलीही निवडणूक असली तरी माझ्या घरातले कोणीही मतदान बुडवत नाही, मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे.. याची जाणीव आम्हाला आहे.. असं वक्तव्य सुबोध भावे यांनी केलं आहे.

     

  • 09:06 AM • 13 May 2024
    Maharashtra News Live : रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात

    मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान केंद्रावर… मतदान केंद्रांवर लागल्या रांगा… निसर्गाच्या सानिध्यात मतदान व्हावं यासाठी मोठ्या उपाययोजना देखील करण्यात आल्या… वृद्ध व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर तरीही मतदानाचा मतदारांनी बनवला हक्क… एक एक मताची आवश्यकता असते त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावला.

  • 08:56 AM • 13 May 2024
    Jalna Lok Sabha : जालना लोकसभा मतदार संघात उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात

    जालना लोकसभा मतदार संघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडतेय. जालना लोकसभा मतदार संघात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालीय. नागरिक मोठ्या उत्स्फूर्त पणे रांगेत उभे राहून मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मतदानावेळी मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलीय. शिवाय चोख पोलिस बंदोबस्त ही मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलाय. याच बरोबर मतदारांसाठी मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था, बसण्याची व्यवस्था ही करण्यात आलीय. कोवळ्या उन्हात नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर गर्दी करत असून मतदानाचा अधिकार बजावत आहेत.
     

  • 08:55 AM • 13 May 2024
    Voting LIVE Updates : संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी EVM बंद

    छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याचं समोर आलं आहे. सुमारे 25 ठिकाणी यामुळे मतदान प्रक्रिया रखडली आहे

  • 08:53 AM • 13 May 2024
    Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात कोणत्या 11 मतदारसंघात मतदान?

    जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे.

     

follow whatsapp