Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : "...त्यासाठी तयार रहा", मोदींचं नाव घेत पवार काय बोलले?

मुंबई तक

18 Apr 2024 (अपडेटेड: 18 Apr 2024, 02:42 PM)

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : वाचा महाराष्ट्रातील सर्व घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स... 

sharad pawar slams pm narendra modi on came into politics by holding my finger maharashtra politics pune news

माझ्या बोटाचा गैरफायदा कुणी असा घेत असेल, तर मामला कठीण आहे

follow google news

Lok Sabha election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजे १९ एप्रिल रोजी होत आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामध्ये प्रचाराने जोर धरला आहे. लोकसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्याचे ताजे अपेडट्स...

 

 

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 02:39 PM • 18 Apr 2024
    Sharad Pawar : "...त्यासाठी तयार रहा", मोदींचं नाव घेत पवार काय बोलले?

    सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी (18 एप्रिल) दाखल केले. 

    यावेळी शरद पवार म्हणाले, "सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी असते. लोकशाही जगवण्यासाठी असते. लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे काम याठिकाणी होत असेल, तर तुमची माझी जबाबदारी आहे की, मोदी आणि त्यांच्या विचारांचा शंभर पराभव करणं, हेच काम करायचं आहे. त्यासाठी तयार रहा."

  • 01:31 PM • 18 Apr 2024
    'त्यांच्या पदरात धोंडे', एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना टोला

    सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना टोला लगावला. 

    ते म्हणाले की, "लेक आणि सुनेत जे भेदभाव करतात त्यांना मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे, त्यांच्या पदरात धोंडे पडतात."

    "मोदीजी म्हणाले, शरद पवार त्यांचे राजकीय गुरु होते. पण मोदींनी शरद पवारांचं बोट सोडलं तेव्हा देशाचा कायापालट केला. तसेच अजित पवारांनी सुद्धा आता शरद पवारांचं बोट सोडलंय. त्यामुळे कोणाला मत द्यायचं तुम्हाला माहिती आहे", असा चिमटा शिंदेंनी पवारांना काढला.

     

  • 11:46 AM • 18 Apr 2024
    ratnagiri sindhudurg lok sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे, राणेंचे नाव जाहीर

    शिवसेना-भाजपमध्ये ज्या जागेवरून रस्खीखेच सुरू होती. त्या जागेचा अखेर निर्णय झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्ह असणार आहे. 

    भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. कोकणात शिवसेनेचे समर्थन करणारा मतदार मोठा आहे, पण यावेळी रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाण हे निवडणूक नसणार आहे.

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी.

     

    महायुतीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे, तर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपकडे गेली आहे. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता शिवसैनिक महायुतीकडे जाणार की, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात मते टाकणार, याची उत्सुकता असणार आहे.

  • 10:43 AM • 18 Apr 2024
    "उद्धव ठाकरे जवाब दो", सोमय्यांनी नंदकिशोर तिवारीवरून घेरलं

     

    भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा उद्धव ठाकरेंकडे वळवला असल्याचे दिसत आहे. मद्य धोरणावरून लक्ष्य केल्यानंतर आता सोमय्यांनी नंदकिशोर तिवारीवरून ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
     
    ट्विटमध्ये सोमय्यांनी म्हटलं आहे की, "इन्कम टॅक्सने उद्धव ठाकरे कुटुंबाचे बेपत्ता भागीदार हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील 200 एकर जमीन जप्त केली आहे."

    "लखनौमध्ये 200 एकरवर टाऊनशिप विकसित करत असताना हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी ईडी-सीबीआयच्या रडारवर आला", असं सोमय्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

     

  • 09:07 AM • 18 Apr 2024
    उदयनराजे भोसले दाखवणार ताकद, आज भरणार उमेदवारी अर्ज

    सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत. 

    "आई भवानीमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने लोकसभेच्या मैदानात उतरतोय. सातारा जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन फॉर्म भरतोय. उद्या गुरुवार दि 18 रोजी सकाळी 10 वाजता. गांधी मैदान, सातारा", अशी माहिती त्यांनी दिली.


     

  • 08:46 AM • 18 Apr 2024
    Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला

    महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

    दक्षिण मुंबईत शिवसेनेचे दीपक केसरकर, भाजपचे प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पाटील असे तीन नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. यात जागावाटपाच्या निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. 

    ठाणे, नाशिक, औरंगाबाद कुणाला?

    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. या तिन्ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याचे समजते. 

    ठाण्यातून प्रताप सरनाईक, तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे हे उमेदवार असल्याचे समजते. 

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपकडे?

    भाजप आणि शिवसेनेने जागावाटपात प्रतिष्ठेची केलेली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपकडेच राहणार असल्याचे समजते. या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे भाजपकडून महायुतीचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागेसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत.

     

follow whatsapp