Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यात (१३ मे) मतदान होत आहे. या मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा ११ मे रोजी थंडावल्या.
नंदुरबार लोकसभा, जळगाव लोकसभा, रावेर लोकसभा, जालना लोकसभा, औरंगाबाद लोकसभा, मावळ लोकसभा, पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, अहमदनगर लोकसभा, शिर्डी लोकसभा आणि बीड लोकसभा या मतदारसंघाचा समावेश चौथ्या टप्प्यात आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीच्या रणनीतीवर काम सुरू झाले आहेत. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कमी राहिला आहे. त्यामुळे चौथ्या टप्प्यात ते वाढणार का? याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.
महाराष्ट्रात आता अखेरच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यातील मतदारसंघात प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह उद्धव ठाकरे, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे आपापल्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेताना दिसत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मतदारसंघातील गणिते आपल्या बाजूने करण्यासाठी बेरजेचं राजकारणही होताना दिसत आहे.
महाराष्ट्र आणि देशातील लोकसभा निवडणूक आणि राज्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:59 PM • 12 May 2024आनंद दिघेंशी माझे मैत्रीपूर्ण संबंध होते : राज ठाकरे
आनंद मठात गेलो. आनंद मठात गेल्यावर सगळे जुने दिवस आठवले. माझे आणि आनंद दिघे यांचे मैत्रिपूर्वक संबंध होते. मी त्यांना नेहमी म्हणत असे स्वच्छ ठेवत जा . आज गेलो तर लक्षात आलं नाही की याच वास्तूत यायचो ते. पण तेव्हा त्यांच्याबरोबर ठाण फिरताना माझा यायची. टुमदार होते तेव्हा ठाणे. तेव्हा काय इतकी मोठी व्यासपीठ नव्हती. ठाण्याला तलवांवचे शहर म्हणण्याचे, तलावांचे शहर बुजवले आणि टँकर सुरू झाले. मी खूप आधीच सांगत नाही 30 वर्षापूर्वी असावं. आता इमारती आणि काँक्रिट जंगल उभी राहतात.
या देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येतात. मात्र या ठाणे शहरात बाहेरचे लोंढे थांबत नाही तोपर्यंत काही घडू शकत नाही.कितीही खासदारांनी निधी आणला तरी काही होणार नाही. सगळ गणित लोकसंख्येच गणित आहे. ठाणे जिल्ह्यात सहा महा नगर पालिका आहेत. एका जिल्ह्यात इतक्या महापालिका. ठाणे जिल्ह्यात बाहेरून येण्याचं प्रमाण अधिक. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना इतकंच सांगेन की खासदार म्हणून जाल तेव्हा बाहेरच्या लोकांना थांबण्यासाठी काहीतरी आवाज उठवा.
पहिली लोकसभेची निवडणूक पाहतोय ज्यात विषयच नाही. विषय नसल्याने एकमेकांच्या बद्दल उद्धार करत सुटलेत. वडील चोरले हा विषय निवडणुकीत वापरला. फोडा फोडीचे राजकारण मलां कधीही मान्य झाला नाही होणार नाही. मात्र महाविकास आघाडीचे एकमेकांकडे पाहिला पाहिजे. खोके देऊन सात नगरसेवक तोडताना काही वाटलं नाही का? शरद पवार यांनी फोडा फोडीच्या राजकारणाला सुरुवात केली. 1991 याच पवारांनी छगन भुजबळ यांना फितवल आणि बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मी काहीही बोलू शकतो. बाहेरून पाठिंबा आहे. फेविकॉल थोडी लागला आहे अजून नारायण राणे यांनी पुन्हा काँग्रसने बाळासाहेब यांची शिवसेना फोडली. आजचे नेतृत्व तेव्हा टाहो फोडताना दिसले नाही.
सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ लावून 70 -75 म्हाताऱ्या असे बाळासाहेबांना म्हणणाऱ्या बाईला तुम्ही पक्षाची प्रवक्ते करता. वडिलांना अटक करायला निघालेल्या छगन भुजबळ यांच्याबरोबर बसणार नाही असे वाटले नाही. मी बाहेर पडलो तेव्हा सांगून बाहेर पडलो. तेव्हा त्यांनी विचारले काय करणार तेव्हा माहीत नाही सांगितले. मात्र बाळासाहेब यांच्या हता व्यतिरिक्त कोणाच्या हाताकडे काम करणार नाही हे मनाशी ठरवले होते. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच नवीन तुम काढली. मग चार भिंतीत झालेली गोष्ट का नाही उघड केली. निकाल लागल्यावर सांगता आधी का नाही सांगितलं तुम्ही. कोण कुठच्या पक्षात आहेत तेच कळत नाही हल्ली 2019 नंतर गोंधळ उडाला तुमच्या महत्त्वकांक्षे पायी मी नरेंद्र मोदी यांना शिव्या घालतो. हो मी घालतो चुकीचं आहे तर ते चुकीचं असल्याचंच सांगितलं. तुम्हाला जे मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलतायत. मला मुद्दे पटले नाही ते बोललो. अनेक मुद्दे आजही पटत नाही. पण जे मान्य करण्यासारखे आहे मान्यच करावे लागेल.
- 11:53 AM • 12 May 2024Lok Sabha election Maharashtra : "मोदींना २०१२ पासूनच शिवसेना फोडायची होती"
काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल एक स्फोटक दावा केला आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत बोलताना केतकर यांनी हे विधान केले.
"फॅसिस्ट प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्या देशाचं राज्य २०१४ पासून ताब्यात घेतलं आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्र लुटून गुजरातला नेत आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सूरत लूट केली, त्याचा वचपा हे दोघेजण काढत आहेत", असं केतकर म्हणाले.
"पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव पुढे येण्याआधी लालकृष्ण आडवाणी हे नाव चर्चेत होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की, आमचा पाठिंबा सुषमा स्वराज यंना आहे. ही भूमिका घेतल्याने मोदींच्या हे लक्षात आलं की, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आपल्या बाजूने नाही. त्यांनी ठाकरेंना धडा शिकवायचा हे ठरवलं होतं. २०१२ मध्येच त्यांना शिवसेना फोडायची होती", असे विधान केतकर यांनी केले.
"२०१२ मध्ये त्यांनी धडा शिकवण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये मोदींनी करून दाखवलं. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच शिवसेनेला संपवण्याचा निर्धार झाला होता. सर्वसामान्य जनतेला कळायला उशीर झाला", असा दावा केतकरांनी केला.
- 10:14 AM • 12 May 2024Thane Lok Sabha : ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम
ठाणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार द्यावा अशी पक्षाच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. पण, ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली. या जागेवरून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर कऱण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. पण, अद्यापही ही नाराजी कायम असल्याचे दिसत आहे. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष हे ठाण्यात होते. त्यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपला जागा न मिळाल्याने कोण नाराज आहे, असा प्रश्न संतोष यांनी बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला. त्यावर उपस्थितांनी हात वर केले.
त्यावेळी संतोष म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे नाराज होऊ नका. काम करा", असे ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
- 09:41 AM • 12 May 2024Eknath khadse : "मोदींना सरकार बनवण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत लागू शकते"
"सरकार बनवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मदतीची गरज भासू शकते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही नेत्यांना काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याची ऑफर दिली असावी, असे माझे मत आहे", असे एकनाथ खडसे यांनी मोदींच्या विधानाबद्दल म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे म्हणाले की, "सत्ताविरोधी लाट असल्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरेंची सरकार बनवण्यासाठी मदत लागू शकते. राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्यातील राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा जो तो आपापल्या परीने अर्थ काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको", असेही खडसे म्हणाले.
- 09:34 AM • 12 May 2024Maharashtra Lok Sabha Updates : भाजपचे उद्धव ठाकरेंना पाच सवाल
उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिल्ली उडवली आहे. एक पोस्ट करत बावनकुळे यांनी पाच प्रश्न विचारले आहेत.
"एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच."
"उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.
1) दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
2) १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
3) सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
4) राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
5) उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?"उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. जय महाराष्ट्र!"
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT