Maharashtra News Live: "जिथे शिवसेनेला मतदान होतंय, तिथेच...", ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट

मुंबई तक

20 May 2024 (अपडेटेड: 20 May 2024, 05:01 PM)

Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ताज्या घडामोडी, राजकीय बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स वाचा...

Mumbaitak
follow google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live Updates : देशात पाचव्या, तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

उत्तर मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा, उत्तर मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मुंबई लोकसभा, पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, धुळे लोकसभा, नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा या मतदारसंघांचा पाचव्या टप्प्यात समावेश आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानाबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय प्रचाराचा धुरळा खाली बसला असला, तरी कोण जिंकून येणार, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष झाला आहे. त्याचबरोबर या निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्रात कोण ताकदवान आहे, हेही स्पष्ट होणार आहे. 

महाराष्ट्र, देशातील लोकसभा निवडणूक, तसेच राज्यातील महत्त्वाच्या घटना घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा लाईव्ह अपडेट्स...

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:50 PM • 20 May 2024
    "जिथे शिवसेनेचे मतदान, तिथेच हे प्रकार होताहेत", ठाकरेंच्या संतापाचा कडेलोट

    उद्धव ठाकरे म्हणाले...

    "महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा एक-दीड तासात थांबेल. मी माहिती घेतोय. मतदारांमध्ये उत्साह खूप आहे. मतदारांची गर्दी दिसतेय. पंरतू निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय, असं स्पष्ट दिसत आहे. निवडणूक आयोगाचे तथाकथित प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात आहे. विशिष्ट वस्त्यांमध्ये दोन-तीन वेळा नावे तपासली जात आहे."

    "मतदारांसाठी कुठलीही सोय केलेली नाही. पिण्याचे पाणीही नाही. रांगेत असलेल्या मतदारांना आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ लागतोय. मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतोय. याबद्दल मी नागरिकांना आवाहन करतो की, मतदान करा."

    "जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत. कितीही वेळ झाला तरी सोडू नका. पहाटे पाच-सहा वाजले तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका. कुठल्याही मतदारसंघातील जी केंद्र आहेत, जिथे तुम्हाला विलंब केला जात आहे. त्याची नोंद तिथल्या शिवसेना शाखेत करा. निवडणूक प्रतिनिधींची नावे विचारा. आपल्याला न्यायालयात दाद घेता येईल. त्यांची नावे आली, तर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती जाहीर करू टाकेन." 

    "तुम्ही मतदानाला उतरू नये म्हणून मोदी सरकारचा डाव आहे. तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्या विरोधातील मतदान कमी कसं होईल हे ते बघत आहेत. त्या डावाला बळी न पडता तुम्ही मतदान केंद्रात उभे रहा. जे लोक उभे असतील, त्यांनी मतदान केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही. अगदी पहाटे पाच वाजले तरी." 

    "जे अधिकारी विलंब लावताहेत. कारण नसताना छळत आहेत. तुमच्या ओळखपत्रावरून जो वेळ काढत आहेत. तर मतदान केल्याशिवाय त्यांना बाहेर पडू देऊ नका. ज्या भागात आम्हाला मतदान अधिक होतं, त्या भागातून आम्हाला या तक्रारी मिळत आहेत. शिवसेनेला जिथे मते मिळतात तिथेच विलंब लावला जात आहे."

  • 01:17 PM • 20 May 2024
    Lok Sabha Election Live : पूनम महाजनांना विधानसभेला उमेदवारी?

    उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांना यावेळी तिकीट देण्यात आले नाही. त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

    पूनम महाजन यांना लोकसभेचे तिकीट न देण्याचे कारण विधानसभा निवडणूक असल्याचे संकेत मिळत आहेत. खूद्द देवेंद्र फडणवीस यांनीच तसे विधान केले आहे. त्यामुळे पूनम महाजन या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकतात. 

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

  • 01:11 PM • 20 May 2024
    Hsc Result 2024 Maharashtra Board Date : उद्या बारावीचा निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकालाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (21 मे) जाहीर करण्यात येणार आहे.

  • 11:47 AM • 20 May 2024
    Maharashtra Lok Sabha Live : ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना मुंबईत पोलिसांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आमदार सुनील राऊतांनी संताप व्यक्त केला. सुनील राऊत यांनी मतदान केंद्र परिसरात पोलिसांनाच धारेवर धरले. 

    मुंबईतील भांडूप येथील मतदान केंद्राबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक डमी ईव्हीएमवर मतदान कसे करायचे यासंदर्भात मतदारांना माहिती देत होते. त्यावर आक्षेप घेत पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

    हे घडल्यानंतर आमदार सुनील राऊत आक्रमक झाले. त्यांनी लगेच पोलिसांना जाब विचारला. 'आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून १०० मीटर दूर होते. मतदारांना मार्गदर्शन करत होते. त्यांना ताब्यात का घेतले?, असा सवाल पोलिसांनी विचारला. 'आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. त्यांना धमक्या दिल्या जात आहे. भाजपला पराभव दिसू लागला आहे म्हणून पोलिसांवर दबाव आणला जात आहे", असे ते म्हणाले. 

     

  • 11:37 AM • 20 May 2024
    Maharashtra Politics : राज ठाकरेंनी एकही जागा का नाही? फडणवीसांनी सांगितली बंद दाराआडची गोष्ट

    राज ठाकरे दक्षिण मुंबई किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते. पण, त्यांना एकही जागा महायुतीत मिळाली नाही. राज ठाकरेंनी नंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.

    एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर राज ठाकरेंनी ही भूमिका जाहीर केली होती. त्या बैठकीत काय घडलं होतं, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उलगडा केला. 

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जागा शिंदेजींकडे होती. शिंदेजी राज ठाकरेंना जागा सोडायला तयार होते, पण त्यांचं म्हणणं हे होतं की, ही धनुष्यबाणाची (शिवसेना) जागा आहे. तर तुम्ही धनुष्यबाण चिन्हावर लढा. त्यांचं (राज ठाकरे) म्हणणं होतं की, माझ्याकडे निवडणूक चिन्ह आहे. मी तुमचं निवडणूक चिन्ह कसं घेऊ? यांनी (शिंदे) सांगितलं की, मी माझं चिन्ह इथून जाऊ देऊ शकत नाही. मग शेवटी ते (राज ठाकरे) म्हणाले की, सोडा. विधानसभेला बघूयात. मी तुम्हाला बिनाशर्त पाठिंबा देतो."

  • 11:30 AM • 20 May 2024
    Lok Sabha election : पाचव्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघात किती झालंय मतदान?

     

  • 11:24 AM • 20 May 2024
    Maharashtra Lok Sabha election 2024 : महाराष्ट्रात जातीवरून पाडापाडी; संभाजीराजे म्हणाले...

    लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे महत्त्वाची ठरताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राजकारणही तापलं आहे. जातीच्या मुद्द्यावरून पाडापाडी होणार, अशी चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे. 

    दरम्यान, याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. "जातीचा मुद्दा करुन पाडापाडी करणे अत्यंत चुकीचे आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, यासाठी माझा लढा आहे. अठरा पगड बारा बलुतेदारांचे राज्य आहे."

    "आपल्या जातीवर आपले प्रेम असणे यात काही चुकीच नाहीये. पण याला पाड हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. मी स्वत: या मताचा नाही. मी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे. सगळ्या बहुजन समाजातील लोकांना सोबत घेऊन जाणे माझी जबाबदारी आहे. माझा मराठ्यांसाठी लढा का आहे? गरीब मराठ्यांना न्याय मिळालेला नाही. जो इतर समाजाला मिळाला आहे”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली.

  • 11:10 AM • 20 May 2024
    Amol Kirtikar : वडिलांची उणीव जाणवली, कीर्तिकरांनी व्यक्त केल्या भावना

    उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतदान केले. यावेळी बोलताना त्यांनी वडिलांची उणीव जाणवली, अशा भावना व्यक्त केल्या. 

    अमोल कीर्तिकर म्हणाले, "घरी राजकीय चर्चा होत नाहीत. आजही ते उशिरा मतदान केंद्रावर जाणार आहेत. १०० टक्के गजानन कीर्तिकर यांची उणीव भासली. एखादी व्यक्ती अनेक वर्ष काम करत असते. ती अचानक विरोधात गेल्यावर अडचण होते. मात्र, वडिलांची उणीव भरून काढण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी केले."

    "वडील आणि मुलगा, आई आणि मुलगा हे नाते वेगळे असते. तुम्ही कितीही काही केले तरी आई वडिलांचं मुलांवर प्रेम असते. तुम्हा दाखवा अथवा नका दाखवू, ते निसर्गाने दिलेले आहे आणि हिंदू संस्कृतीने पण दिले आहे", असे कीर्तिकर म्हणाले. 

  • 08:53 AM • 20 May 2024
    Maharashtra Live : महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल?

    विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा नेता असेल का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

    'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "याबद्दल स्पष्टता केली जाऊ शकते किंवा केलीही जाणार नाही. मी यामुळे म्हणतोय की, भाजपची स्ट्रॅटजी आहे. आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात आपण बघितलं आहे. भाजप विधानसभेची निवडणूक अनेकदा बिनचेहऱ्याची लढते. अनेकदा चेहरा देऊन लढते."

    "याचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेते. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे आणि सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. महायुतीतही सर्वात मोठा पक्ष राहणार आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, सर्वात मोठा पक्ष आहे म्हणून आमचाच मुख्यमंत्री बनेल. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय आमच्या सोबतच्या पक्षासोबत चर्चा करून आणि आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल. आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल... शिंदेजींना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही त्या निर्णयासोबत असू", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow whatsapp