Maharashtra Lok Sabha 2024 Live : '...तर विधानसभत नाव घेऊन पाडू', जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई तक

31 May 2024 (अपडेटेड: 31 May 2024, 04:41 PM)

Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होत आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल घोषित होणार असून, कुणाचं सरकार येणार आणि बहुमतासह येणार की मित्रपक्षासह सत्तेत येणार, हे स्पष्ट होणार आहे. पण, त्यापूर्वीच राजकीय विश्लेषक आणि निवडणूक अभ्यासकांकडून अंदाज मांडले जाताहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी काय सुरू आहेत घडामोडी वाचा लाईव्ह अपडेट्स...

manoj jarange, maratha reservation

manoj jarange, maratha reservation

follow google news

Maharashtra Lok Sabha Election Live Update : सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सध्या सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यातच निवडणूक झाली. 

लोकसभेसाठी अखरेच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान मतदान झाल्यानंतर कोण जिंकणार, कुणाला किती जागा मिळणार आणि सत्तेचं समीकरण कसे असू शकते, याबद्दलचे अंदाज एक्झिट पोलमधून मांडले जातील. त्यामुळे गावखेड्यांपासून दिल्लीपर्यंत वातावरण आणखी तापणार आहे. 

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यांची नजर महाराष्ट्रातील निकालाकडे आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत बहुतांश मतदारसंघांमध्ये झाली असून, काही ठिकाणी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या उमेदवारांमुळे कुणाला फटका बसणार यावर निकालाचे गणित अवलंबून असणार आहे. 

तूर्तास तरी राजकीय विश्लेषक महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. दुसरीकडे मुंबईतील सट्ट बाजारातही हा अंदाज चर्चिला जात आहे. त्यामुळे कोणाला किती जागा मिळणार हे निकालच सांगेल. 

लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व महत्त्वाचे लाईव्ह अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी...

लाइव्हब्लॉग बंद

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:40 PM • 31 May 2024
    '...तर विधानसभेत नाव घेऊन पाडू', जरांगे पाटलांचा इशारा

    मी निवडणुकीतच नाही मग कसं कळणार कोण निवडून येईल. मी कोणाचं नाव घेऊन बोललो नाही की याला पाडा. पण जर मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेऊन पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 

  • 01:25 PM • 31 May 2024
    Lok Sabha 2024 News : महाराष्ट्रासह 'हे' राज्य ठरवणार भाजपला किती मिळणार जागा?

    ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी जागांच्या आकडेवारीबद्दल बोलताना महत्त्वाचे भाष्य केले आहे. 

    "लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकेल, याबद्दलचे अचूक आकडे माझ्याकडे नाहीत. पण, मी सांगू शकतो की, 400 पार जागा मिळणार नाही. मला वाटतं की या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. राहिला जागांचा मुद्दा, तर माझा अंदाज आहे की, भाजपला 272 ते 300 दरम्यान जागा मिळू शकतात", असे ते म्हणाले. 

    "लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील, हे सगळं उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातील कामगिरीवर अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर कर्नाटक असे राज्य आहे, जिथे भाजपला मोठे नुकसान होऊ शकते. मी त्या लोकांपैकी नाही की, जे म्हणताहे की, भाजपला बहुमत मिळणार नाही", असेही राजदीप सरदेसाई म्हणाले.

  • 01:13 PM • 31 May 2024
    Lok Sabha Election Phase 7 : 57 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात; 2019 मध्ये कुणी किती जिंकलेल्या?

    लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होत आहे. या टप्प्यात ७ राज्यातील 57 जागांसाठी मतदान होत आहे. 57 जागांवर 904 उमेदवार रिंगणात असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, अभिनेत्री कंगना रणौत यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. 

    2019 मध्ये कुणी किती जिंकल्या होत्या जागा?

    सातव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या 57 लोकसभा मतदारसंघाचे 2019 मध्ये निकाल काय आले होते तेही पाहा...

    57 पैकी सर्वाधिक 25 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यानंतर तृणमूल काँग्रेस 9, काँग्रेस 8, बिजू जनता दल 4, जदयू 3, बसपा 2, शिरोमणी अकाली दल 2, अपना दल 2, झारखंड मुक्ती मोर्चा 1 आम आदमी पार्टीला 1 जागा मिळाली होती. 

  • 11:15 AM • 31 May 2024
    Lok Sabha Election Updates : "48 तासांत घोषित करणार पंतप्रधान पदाचा उमेदवार"

    इंडिया आघाडीला बहुमत मिळाले, तर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, ही चर्चा निवडणुकीच्या सुरूवातीपासून सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी उत्तर दिले. 

    पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रमेश म्हणाले की, "यावेळी निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळत आहे. यात कोणतीही शंका नाही की, ४ जून रोजी पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जातील. इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल आणि ५ वर्षांसाठी स्थिर, संवेदनशील आणि जबाबदार सरकार देईल. पुढील ४८ तासांत आम्ही आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करू", असे ते म्हणाले. 

  • 09:42 AM • 31 May 2024
    Lok sabha Elections Exit Poll : 2019 मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज, निकाल कसा लागलेला?

    २०१९ मध्ये बहुतांश एक्झिट पोलने भाजपचे सरकार येईल असे अंदाज व्यक्त केले  होते. गेल्या वेळी इंडिया आघाडी नव्हती, तर युपीए आघाडी अस्तित्वात होती. नेमके एक्झिट पोलचे अंदाज काय होते पहा...
     

    लोकसभा निवडणूक आणि एक्झिट पोल
    एजन्सी भाजप+ काँग्रेस+ इतर
    आजतक-माय अ‍ॅक्सिस 339-365 77-108 79-111
    एबीपी नेल्सन 267 127 148
    इंडिया टीव्ही सीएनएक्स 300 120 122
    न्यूज18 इप्सोस 336 82 124
    न्यूज24 चाणक्य 350 95 97
    टाइम्स नाऊ-व्हीएमआर 306 132 104
    न्यूज नेशन 282-290 118-126 130-138
    रिपब्लिक सी व्होटर 305 124 113

    लोकसभा 2019 निवडणुकीचा काय लागला होता निकाल?

    23 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते, त्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएमधील घटक पक्षांनी 51 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या, तर द्रमुकला 24 जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसला 22, बसपा, 10, समाजवादी पार्टी 5, तेलंगणा राष्ट्र समिती 9, एमआयएम 9, भाकपा 2, माकपा 3, बिजू जनता दल 12, टीडीपी 3, आप 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या. 
     

  • 09:12 AM • 31 May 2024
    Maharashtra Lok Sabha updates : चंद्रपूर लोकसभेबद्दल सट्टा बाजाराचा अंदाज काय?

    लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वी सट्टा बाजार तापला आहे. निकालाबद्दलचे सट्टा बाजाराचे अंदाज समोर आले आहेत. काही लोकसभा मतदारसंघांबद्दल अंदाज व्यक्त केले गेले असून, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाबद्दल भाजपला धक्का देणारा अंदाज आहे. 

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिलेली आहे. तर बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसने यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलेले आहे. 

    सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा विजय होईल. असा निकाल आल्यास सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला हीच एकमेव जागा जिंकता आली होती. 

follow whatsapp