Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. मराठवाड्यातील काही मतदारसंघ, खान्देश, अहमदनगर आणि मुंबईतील मतदारसंघांचा चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात समावेश आहे.
मुंबईतील सहा मतदारसंघ, कल्याण, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराची धग वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील तीन मतदारसंघ आहेत.
राजकीय पक्षांकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धडधड केली जात आहे. दुसरीकडे आपापला उमेदवार निवडून यावा, म्हणून राजकीय समीकरणे जुळवून आणताना राजकीय पक्षाचे नेते दिसत आहेत. या सगळ्यांबद्दलचे अपडेट्स वाचा...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:29 PM • 07 May 2024गोपीनाथ मुंडेंसारख्या सहकाऱ्याला गमावल्याचं दु:ख : नरेंद्र मोदी
बीडचा गोपिनाथ मुंडेंशी हृदयाचे नाते आहे. गोपिनाथ मुंडेंकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. पण मला या साथिदाराला गमवावा लागलं. गोपिनाथजी, सुषमा स्वराज्य अशा अनेक साथिदारांना मी गंमावल.
पहिल्या टप्प्यात इंडिया आघाडी पडली, दुसऱ्या टप्प्यात संपली आणि तिसऱ्या टप्प्यात दिव्याच्या प्रकाशा इतकीही उरली नाही.
इंडिया आघाडी कोणत्या अजेड्याने निवडणुकीत उतरली आहे. त्याचा एक अजेंडा आहे मिशन कॅन्सल. कलम 370 मोदींनी हटवलं ते पुन्हा आणतील. किसान सन्मानची योजना बंद करून टाकतील.
असली राष्ट्रवादी पार्टी भाजपसोबत आहे, असली शिवसेना भाजपसोबत आहे. आणि काँग्रेससोबत नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे.
जिथपर्यंत महाविनाश आघाडी सरकार होती तिथपर्यंत काम करूच दिली नाही. बुलेट ट्रेनला काम ठप्प करतील.
- 04:22 PM • 07 May 2024नगरमधून PM मोदींची इंडिया आघाडीवर टीका, '4 जूननंतर...'
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट केले आहे की 4 जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी डेट ठरली आहे. 4 जून नंतर इंडी आघाडीचा झेंडा उचलणाराही कोणी सापडणार नाही.
हे काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला निर्दोष ठरवलं.हे मुंबई हल्यात मारलेल्या गेलेल्या सगळ्या निर्दोष नागरीकांचा अपमान आहे. हा सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. तुकाराम ओंबळेंसारख्या शहिदांचा हा अपमान आहे.
अशा काँग्रेस आणि इंडी आघाडीला महाराष्ट्रात एक तरी सीट मिळाली पाहिजे का? मोदींनी 10 वर्षात सुरक्षा आणि विकास या दोघांची गॅरटी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात टाकलं, दुष्काळाच संकट वाढत गेली, पण काँग्रेस आपल्या लुटीत व्यस्थ होती.
निळवंडे डॅमच काम 1970 मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी डॅमचा खर्च 8 करोड होती. आज ती वाढून 5 हजार करोड झाली आहे. हे पाप यांनी केले आहे. डॅमच्या नावावर काँग्रेस नेत्यांची खिसे भरत राहिली. आणि शेतकऱ्याची शेती सुखीच राहिली. 2017 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी गती दिली. लेफ्ट कॅनॉलचा काम पूर्ण झाले आहे. लवकरच ही य़ोजना सुरु होईल.
- 02:00 PM • 07 May 2024Palghar lok sabha updates : शिंदेंच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; तिकीट कापताच निर्णय
शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिंदेंची साथ सोडत भाजपमध्ये घरवापसी केली. २०१८ मध्ये पालघरच्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये शिवसेनेने ही जागा मागितली. त्यावेळी शिवसेनेने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे शिवसेनेत गेलेल्या राजेंद्र गावितांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला.
२०२४ मध्ये राजेंद्र गावित हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. शिवसेना ही जागा स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्नशील होती. पण, महायुतीत ही जागा भाजपकडे गेली. भाजपने या मतदारसंघातून माजी खासदार विष्णू सावरा यांचे सुपूत्र हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली.
- 01:33 PM • 07 May 2024Sanjay Raut News : फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री आहात -संजय राऊत
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी एका कार्यकर्त्याला शिवीगाळ केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यावरून खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संताप व्यक्त केला.
राऊतांनी एक पोस्ट केली. त्यांनी म्हटलं आहे की, "आमदार दत्तात्रेय भऱणेंची काँग्रेसवर दमदाटी. सहानंतर तुम्हाला कोण विचारणार. ही दादागिरी कोणाच्या जीवावर सूरू आहे? मतदान केंद्रावर धमक्या देणे शिव्या देणे. गावात कसा राहतो ते बघून घेतो, ही भाषा कोणाच्या जीवावर सुरु आहे?", असा सवाल राऊतांनी केला आहे.
"फडणवीस, तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री आहात. महाराष्ट्राची तुम्ही वाट लावलीत. मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा", असा संताप राऊत यांनी केला आहे.
- 10:46 AM • 07 May 2024Sanjay Raut : "अजित पवारांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय"
सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी दिल्यावरून खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.
"बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बळीचा बकरा बनवले", अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी नारायण राणेंवरही टीका केली. ते म्हणाले, "नारायण राणे हे पराभवाचा चौकार मारतील. आम्ही आधी मुंबई आणि नंतर कोकणात त्यांचा पराभव केला. आता ते मोठ्या लढाईत उतरले आहेत, मात्र विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विजयी होतील", असे ते म्हणाले.
मोदी-शाहांना राऊतांनी केले लक्ष्य आहे. ते म्हणाले, "नरेंद्र मोदी यांनी पेडर रोडला आणि अमित शाह यांनी बोरिवलीत घर भाड्याने घेतले आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांना इथेच राहायचे आहे. त्यांना दुसरं काय काम आहे. पण, तुम्ही कितीही खुंट्या ठोका; शिवसेना तुमचा पराभव करेल. मोदींना मुंबईत येऊ द्या, तरीही शिवसेनाच जास्त जागा जिंकेल", असा दावा राऊतांनी केला.
- 09:01 AM • 07 May 2024राज ठाकरेंची शिवसेना उमेदवार जाधवांनी घेतली भेट
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे पती आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हेही सोबत होते. या बैठकीवेळी बाळा नांदगावकर हेही उपस्थित होते.
- 08:42 AM • 07 May 2024Maharashtra Lok Sabha Live : विखे, मुंडेंची प्रतिष्ठा पणाला! मोदींच्या महाराष्ट्रात दोन सभा
PM Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ आणि बीड लोकसभा मतदारसंघात सभा होत आहे.
अहमदनगरमधील हरेहर मैदानावर मोदींची दुपारी १ वाजता सभा होत आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी ही प्रचारसभा होत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होत आहे. अंबाजोगाईतील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होत आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही जातीय समीकरणाकडे झुकलेली दिसत आहे. मराठा फॅक्टर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दिसत असून, त्यामुळे हा फॅक्टर कुणाला साथ देणार, यावर निकालाचं गणित अवलंबून आहे. त्यामुळे मोदी या मतदारसंघात होत असलेल्या सभेत मराठा आरक्षणावर बोलणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे मतदारसंघातील वातावरण आपल्या बाजूने करण्यासाठी मोदींच्याा सभांचा आग्रह उमेदवारांचा आहे. त्यामुळे मोदींची ही सभा किती वातावरण बदलणार, याबद्दलही उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT