Lok Sabha Election Maharashtra Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान असून, प्रचार शिगेला पोहोचला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील तब्बल ११ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक जास्तीत जास्त जागांवर प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.
उन्हाची तमा न बाळगता नेते आणि पदाधिकारी मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. तर पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याच्याही सभांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रासह देशात राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. यासंदर्भातील सर्व ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 05:44 PM • 29 Apr 2024'बकी बार 400 पार'च्या घोषणेवरून रोहिणी खडसे यांचा भाजपवर निशाणा
'मुंगेरीलाल के हसीन सपने' असाच हा 400 पारचा नारा भाजपचा राहणार आहे. कारण इंडिया आघाडीला विकास आघाडीला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या चारशे पारला महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडी थांबवेल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल. अबकी बार 400 पार भाजपच्या या घोषणेवरून' राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- 05:41 PM • 29 Apr 20242024 च्या निवडणुका भारताचे भवितव्य ठरवतील – पीएम मोदी
निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 2024 च्या निवडणुका भारताचे भविष्य ठरवतील. ही निवडणूक विकसित भारतासाठी संकल्पाची निवडणूक आहे. ही निवडणूक स्वावलंबी भारताच्या कर्तृत्वाची निवडणूक आहे. येत्या काही वर्षांत भारत ही जगातील टॉप 3 अर्थव्यवस्था बनली पाहिजे हा आमचा संकल्प आहे. सुट्टी साजरी करणारे हे संकल्प पूर्ण करू शकत नाहीत.
- 05:02 PM • 29 Apr 2024पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका
मोदींची मराठीतून भाषणाला सुरूवात...
कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या सातारकरांना माझा नमस्कार
मी आज तुमचे दर्शन घ्यायला आलो आहे. तुम्ही जो भरोसा आपल्या सेवकावर दाखवला, त्याची जबाबदारी माझी आहे.त्यामुळे मी इथे आलो आहे.
साताऱ्यात भगवा फडकत होता, पुढेही फडकत राहिल.
काँग्रेसने 40 वर्ष सैनिकांच्या कुटुंबियांना वन रँक वन पेन्शनपासून वंचित ठेवल. फक्त 500 करोड रूपये
डोळ्यात धुळ फेकायची याची मास्टरी. काँग्रेसने गुलाबीची मानसिकता वाढवली. - 05:00 PM • 29 Apr 2024'काँग्रेसने गुलामीच्या विचारांना रूजवलं', मोदींची विरोधकांवर टीका!
'साताऱ्यात भगवा फडकत होता, पुढेही फडकत राहिल. पंतप्रधानपदासाठी मला घोषित केल्यावर मी रायगडावर गेलो. कोणतंही काम सुरू करण्याआधी शिवरायांच्या समाधीस्थानी जातो. आम्ही वन रँक वन पेन्शनची गॅरंटी पूर्ण करून दाखवली. काँग्रेसने सैनिकांच्या कुटुंबाला पेन्शनपासून वंचित ठेवलं. आज 1 लाख कोटींची पेन्शन माजी सैनिकांना मिळाली. जगभरात नौसेनेची चर्चा झाल्यावर शिवरायांचं नाव घेतलं जातं. शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोत सामील करण्यासाठी प्रयत्न सरू आहेत. आमच्या सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवलं. काश्मीरमधील दलितांना आरक्षणाची गरज नव्हती का?' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमधील प्रचारसभेत म्हणाले.
- 02:18 PM • 29 Apr 2024Nashik Lok Sabha Updates : 'विरोधक घाबरलेत, कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय होत नाही', जयंत पाटलांचा महायुतीला चिमटा
महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) आणि राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उमेवादीर अर्ज दाखल केला. भास्कर भगरे हे दिंडोरी लोकसभा, तर राजाभाऊ वाजे हे नाशिकमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रॅलीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीला चिमटा काढला.
"राजाभाऊ तुमचा प्रभाव एवढा आहे की, समोर उमेदवार सापडेना झालाय. कुणाला उभं करायचं? म्हणजे मला आधी वाटायचं की राजाभाऊंसारखा सरळ माणूस आमच्या पक्षात असला पाहिजे. असं गेले वर्षभर वाटत होतं, पण राजाभाऊंना विरोधक किती घाबरलेत, कुणाला तिकीट द्यावं, कुणाला नाही; याचा निर्णय होत नाही. घाबरलेल्या युतीला आपण निर्णायक चपराक मारण्यासाठी काम करा", असे जयंत पाटील म्हणाले.
- 12:06 PM • 29 Apr 2024PM Modi In Maharashtra : मोदींचा महाराष्ट्रात धडाका! दोन दिवसांत 6 सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू आहे.
आज आणि उद्या (29, 30 एप्रिल) मोदी यांच्या सहा सभा महाराष्ट्रात आहेत. आज (२९ एप्रिल) सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा होत आहे. तर उद्या (३० एप्रिल) माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहे.
राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील होम मैदानावर सभा होणार आहे. तर उदयनराजे भोसलेंसाठी कराडमध्ये सभा होणार आहे. पुण्यातील सभा हडपसर येथील रेसकोर्स मैदानावर होणार आहे.
- 11:25 AM • 29 Apr 2024Madha Lok Sabha Updates : शरद पवारांना भाजपचा सोलापुरात धक्का; पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट
माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. सोलापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना आपल्या बाजूने वळत शरद पवारांनी भाजपला धक्का दिला. (Abhijit patil is likely to joined bjp)
आता देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरवर लक्ष्य केंद्रीत केलं असून, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी नेत्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी डाव टाकला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेने कारवाई केल्यानंतर अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारातून दूर झाले आहेत. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेले अभिजित पाटील हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.
"अभिजित पाटील हे धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतात. ते शरद पवारांसाठी काम करतात म्हणून त्यांना अडचणीत आणाययचा प्रयत्न होतोय. ते का जातायेत याची कारण तुम्हाला माहित आहेत. त्यांना जाऊ द्या, काही बिघडत नाही. पण, बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायची", असे म्हणत असं जयंत पाटील यांनी आधीच ते जात असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
- 08:54 AM • 29 Apr 2024भाजप खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन
भाजप खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचे रविवारी (28 एप्रिल) रात्री बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते वयाच्या ७६ व्या वर्षाचे होते. कर्नाटकातील चामराजनगर लोकसभेचे ते खासदार होते.
गेल्या ४ दिवसांपासून ते आयसीयूमध्ये होते. श्रीनिवास यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यामुळे त्यांना 22 एप्रिल रोजी बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
व्ही. श्रीनिवास चामराजनगरमधून 7 वेळा खासदार आणि नंजनगुडमधून 2 वेळा आमदार होते. त्यांनी अलीकडेच निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती.
व्ही श्रीनिवास प्रसाद यांचा जन्म 6 जुलै 1947 रोजी अशोकपुरम, म्हैसूर येथे झाला. १७ मार्च १९७४ रोजी कृष्णराज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला होता.
ते बालपणापासून 1972 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक होते आणि जनसंघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सक्रिय होते. दलित नेते आणि राजकारणी असण्यासोबतच ते अभ्यासातही चांगले होते.
- 08:20 AM • 29 Apr 2024Sangli Lok Sabha Election : विशाल पाटलांनी का नाकारली राज्यसभेची खासदारकी?
सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले विशाल पाटील हे प्रचारात अन्याय झाल्याचा मुद्दा अधोरेखित करताना दिसत आहेत. मिरज तालुक्यातील मालगाव येथे प्रचार सभेत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीकडून देण्यात आलेली राज्यसभेच्या खासदारकीची ऑफर का नाकारली याबद्दल खुलासा केला.
"वसंतदादांचा नातू जनतेशी बेईमानी करू शकत नाही. लढाईपासून पळ तर कधीच काढू शकत नाही म्हणून मी राज्यसभेची खासदारकी नाकारली", असा खुलासा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी केला.
"निवडणूक लागली आणि कोण तर आयता आला आणि म्हणाला, चार कुस्त्या केल्यात; मला आता खासदार करा. माझा पक्ष माझ्यासाठी लढू शकला नाही भांडू शकला नाही, याची मला खंत आहे. मात्र वसंतदादांचा नातू जनतेशी बेइमानी करू शकत नाही म्हणून मी राज्यसभेची खासदारकी नाकारली. लोकसभेच्या मैदानात उतरलोय. जनतेच्या पाठिंब्याने दार फोडून संसदेत जाणार", असा निर्धार उमेदवार विशाल पाटील यांनी बोलून दाखवला.
"माझ्यात हिमंत आहे. मी अपक्ष लढत आहे. खासदारात हिमंत असती, तर पक्षाच कवच काढून मैदानात आला असता", असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले, "चोर मला खाली ओढत आहेत. देव मात्र मला वर नेत आहेत. सुरुवातीला मला तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न झाला, नंतर मला अपेक्षित चिन्ह मिळू नये यासाठी षडयंत्र झालं. मतदान यंत्रात माझं नाव खाली रहावे यासाठी सुद्धा प्रयत्न झाला. मात्र, काही फरक पडला नाही. दुसऱ्या मशीनमध्ये पहिल्या क्रमांकावरच माझं नाव आले आहे", असेही विशाल पाटील यांनी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT