Maharashtra News Live Updates : लोकसभा निवडणुकीनंतर अखेर काल (9 जून) एनडीए आघाडीचं सरकार देशात स्थापन झाले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदी यांच्यासह एनडीएच्या 69 खासदारांनी केंद्रीय कॅबिनेट आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाकुणाला संधी मिळेल? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल....
तसंच, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे,
अशाच राजकीय तसंच इतर महत्वाच्या घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:53 PM • 10 Jun 2024केंद्रीय मंत्रिमंडळातं खाते वाटप जाहीर, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं आलं?
केंद्रीय मंत्रिमंडळातं खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी- अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे..
कॅबिनेट मंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण
अमित शहा - गृहमंत्री, सहकार
नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकास.
जेपी नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते
शिवराज सिंह चौहान - कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास
निर्मला सीतारामन - अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार
एल जयशंकर - परराष्ट्र मंत्रालय
मनोहरलाल खट्टर - गृहनिर्माण आणि नगरविकास, उर्जा
एच डी कुमारस्वामी - अवजड उद्योग आणि पोलाद
पियुष गोयल - वाणिज्य आणि उद्योग
धर्मेंद्र प्रधान - शिक्षण
जितनराम मांझी - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग .
राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग - पंचायत राज, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
सर्बानंद सोनोवाल - बंदरे, जहाज आणि जलमार्ग विकास
वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
के राममोहन नायडू - नागरी उड्डाण वाहतूक
प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि अक्षय ऊर्जा
जुआल ओरम - आदिवासी व्यवहार
गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग
अश्विनी वैष्णव - रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान
ज्योतिरादित्य शिंदे - दळणवळण आणि ईशान्य राज्यांचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल
गजेंद्रसिंह शेखावत - सांस्कृतिक आणि पर्यटन
अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री
किरेन रिजिजू - संसदीय कामकाज मंत्री; आणि अल्पसंख्याक विकास
हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
मनसुख मांडविया - कामगार आणि रोजगार, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री.
जी. किशन रेड्डी - कोळसा आणि खाण
चिराग पासवान - अन्न प्रक्रिया उद्योग
सी आर पाटील - जलशक्ती मंत्री.राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
राव इंद्रजित सिंग - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), सांस्कृतिक मंत्रालय (राज्यमंत्री)
जितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान मंत्रालय - (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग -राज्यमंत्री)
अर्जुन राम मेघवाल - कायदा आणि न्याय मंत्रालयाचे (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाज मंत्रालय (राज्यमंत्री)
प्रतापराव जाधव - आयुष मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
जयंत चौधरी - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार), शिक्षण (राज्यमंत्री)राज्यमंत्री
जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (राज्यमंत्री)
श्रीपाद नाईक - ऊर्जा, अक्षय ऊर्जा मंत्रालय (राज्यमंत्री)
पंकज चौधरी - अर्थ मंत्रालय (राज्यमंत्री)
कृष्ण पाल - सहकार मंत्रालय (राज्यमंत्री)
रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
रामनाथ ठाकूर - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
नित्यानंद राय - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि खते मंत्रालय (राज्यमंत्री)
व्ही. सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री)
चंद्रशेखर पेमसानी - ग्रामीण विकास, दळणवळण मंत्रालय (राज्यमंत्री)
एस.पी.सिंग बघेल - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पंचायती राज मंत्रालय (राज्यमंत्री)
शोभा करंदलाजे - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय (राज्यमंत्री)
कीर्तिवर्धन सिंह - पर्यावरण, वन आणि हवामान बदल, परराष्ट्र मंत्रालय (राज्यमंत्री)
बी. एल. वर्मा - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
शंतनू ठाकूर - बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
सुरेश गोपी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन मंत्रालय (राज्यमंत्री)
डॉ. एल. मुरुगन - माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज मंत्रालय (राज्यमंत्री)
अजय टम्टा - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
बंदी संजय कुमार - गृह मंत्रालय (राज्यमंत्री)
कमलेश पासवान - ग्रामीण विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
भगीरथ चौधरी - कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री)
सतीशचंद्र दुबे - कोळसा आणि खाण मंत्रालय (राज्यमंत्री)
संजय सेठ - संरक्षण मंत्रालय (राज्यमंत्री)
रवनीत सिंग - अन्न प्रक्रिया उद्योग, रेल्वे मंत्रालय (राज्यमंत्री)
दुर्गादास उईके - आदिवासी विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
रक्षा निखिल खडसे - युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (राज्यमंत्री)
सुकांता मजुमदार - शिक्षण, ईशान्य राज्यांचे विकास मंत्रालय (राज्यमंत्री)
सावित्री ठाकूर - महिला आणि बालविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
तोखान साहू - गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय (राज्यमंत्री)
राज भूषण चौधरी - जलशक्ती मंत्रालय (राज्यमंत्री)
भूपती राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय (राज्यमंत्री)
हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट व्यवहार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (राज्यमंत्री)
निमुबेन जयंतीभाई बांभनिया - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय (राज्यमंत्री)
मुरलीधर मोहोळ - सहकार, नागरी उड्डाण वाहतूक मंत्रालय (राज्यमंत्री)
जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक विकास, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (राज्यमंत्री)
पब्रिता मार्गेरिटा - परराष्ट्र, वस्त्रोद्योग मंत्रालय (राज्यमंत्री)
- 05:12 PM • 10 Jun 2024'2004 साली मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आता...'; सुनील तटकरे स्पष्टच बोलले!
'2004 साली मुख्यमंत्री पद घेतलं असतं तर आता परिस्थिती वेगळी असती. 2014 साली आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, तेव्हापासूनच सुरूवात झाली होती भाजपबरोबर जायची, असा गौप्यस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी केला. 2009 साली शिवसेनेबरोबर जायचा प्रयत्न झाला. 2014 सालीसुद्धा सेना 16, भाजप 16, राष्ट्रवादी 16 असा फॉर्म्युला ठरला होता पण ते पुढं गेलं नाही,' असं सुनील तटकरे स्पष्टच बोलले.
- 05:00 PM • 10 Jun 2024Maharashtra News : पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जालान नगर परिसरात शहराला पाणीपुरवठा करणारे चौदाशे मिलिमीटर व्यासाची पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे रस्ता खचलाय. पाईपलाईनचे वेगाने येणारे पाणी अंडरग्राउंडमध्ये असलेल्या दुकानांमध्ये घुसलो आहे. त्यामुळे पुस्तकांचा आणि कपड्याच्या दुकानाचे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे.
- 03:11 PM • 10 Jun 2024Mumbai News: कोस्टल रोडचा दुसरा टप्पा ११ जूनपासून सुरु
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर होणार खुला. या बोगद्याचे विहंगम दृश्य पाहा. त्यानंतर, मंगळवार दिनांक ११ जून २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ (एकूण १६ तास) या वेळेत वाहतुकीसाठी मार्ग उपलब्ध होणार.
- 12:42 PM • 10 Jun 2024Lok Sabha Election : मोदींच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक
मोदी सरकार शपथ घेतल्यानंतरच अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज (10 जून) सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी होणार आहे. शपथविधी समारंभ पूर्ण झाल्यानंतर, पीएम मोदींनी X वर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, मी आणि मंत्रिमंडळातील सहकारी देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत.
- 12:21 PM • 10 Jun 2024Maharashtra News : सुप्रिया सुळेंची सरकारवर जोरदार टीका
'पुण्याची आण बाण शान या सरकारमुळे गेली आहे. हे यश फक्त गुलालाचे नाही जबाबदारीचे आहे. आपण पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.', अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
- 12:08 PM • 10 Jun 2024Maharashtra Politics : सत्तेचे विकेंद्रीकरण होत आहे - शरद पवार
'गेल्या 25 वर्षात अनेक कार्यक्रम आपण हाती घेतले.आज देश एका वेगळ्या स्थितीत आहे. देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे मात्र संसदेतील संख्या त्यांची कमी झाली. आम्ही सांगेल तेच धोरण अशी परिस्थिती होती. सत्तेचे विकेंद्रीकरण होत आहे.'असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे...
- 10:50 AM • 10 Jun 2024Maharashtra News: जरांगेंच्या उपोषणाला 48 तास पूर्ण, सरकारकडून अद्याप कुठलीच हालचाल नाही!
मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे यांच्या उपोषणाला 48 तास पूर्ण झाले असून आतापर्यंत सरकारकडून कुठलीच हालचाल झाली नाही आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ विधी सोहळा पार पडला असून आज सरकारकडून हालचाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत आमरण उपोषणावर जरांगे ठाम आहेत. जरांगे यांच्या भेटीसाठी राज्यभरातून मराठा समाज येत असून ते जरांगे यांच्या उपोषणाला त्यांचा पाठिंबा देत आहेत.
- 10:44 AM • 10 Jun 2024Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर
लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले आहेत. 13 जूनला राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ,नेत्यांची, विभाग प्रमुखांची आणि शहर प्रमुखांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. 13 जूनला राज ठाकरे यांच्या कार्यकारिणीची निवडणूक देखील होणार आहे.
- 10:31 AM • 10 Jun 2024Maharashtra News : 'शिंदे, अजित पवार मोदींचे गुलाम...'; संजय राऊतांचे टीकास्त्र
'केंद्रात मोदींचं नाही तर एनडीएचं सरकार आहे. शिंदे, अजित पवार मोदींचे गुलाम आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातून महाराष्ट्राच्या वाटेला काय आलं? शिंदे गटाच्या तोंडावर एक राज्यमंत्रिपद फेकून मारलं. अजित पवार गटाला मिळायचं असतं तर कालच मंत्रिपद मिळालं असतं. त्यांच्या वाट्याला भोपळा आला. गोयल हे शेअर बाजार, व्यापाऱ्यांचे मंत्री... मोदींना देशाबद्दल काही कर्तव्य नाही.' अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्त्र सोडले.
- 08:13 AM • 10 Jun 2024Mumbai News : विक्रोळी पार्क साईट येथे घर कोसळून दोघांचा मृत्यू
विक्रोळी पार्कसाईट, कैलास बिझनेस पार्क, टाटा पॉवर हाऊसजवळ धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत नागेश रामचंद्र रेड्डी 38, रोहित रेड्डी 10 या दोघांचा राजावाडी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा तळमजला धरून ४ माळ्याचं घर कोसळल्याची घटना घडली. यावेळी घराचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान पोहचण्यापूर्वीच दोन जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे
- 08:07 AM • 10 Jun 2024Mumbai Weather Update : मुंबईत येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा IMD चा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सध्या सर्व काही नियंत्रणात आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे,
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT