Arvind Kejriwal arrested Live updates : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटत आहेत. यासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 05:01 PM • 22 Mar 2024शिंदे सरकारकडून इक्बालसिंह चहल यांच्यावर मोठी जबाबदारी
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने चहल यांना हटवले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली.
"मी २ दिवसांपूर्वी भाकित केलं होतं अगदी तसंच घडलंय... मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयावर नियुक्त झालेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री (CM - contractor Minister) ना मदत करण्यासाठी ह्या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झालीये. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेलं हे बक्षिस आहे!", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी या नियुक्तीवर केली आहे.
- 03:23 PM • 22 Mar 2024Lok Sabha Elections 2024 : "मला निवडून देणार का?", पंकजा मुंडेंचा सवाल
पंकजा मुंडे पुणे-नगरमार्गे आज बीड जिल्ह्यात पोहोचल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "तिकीट मागितलं नव्हतं. पण, मला निवडून देणार का? कोण कोण मला निवडून देणार? हात वर करा", अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. यावेळी सभेला उपस्थितांनी हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.
- 03:22 PM • 22 Mar 2024"मला निवडून देणार का?", पंकजा मुंडेंचा सवाल
पंकजा मुंडे पुणे-नगरमार्गे आज बीड जिल्ह्यात पोहोचल्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "तिकीट मागितलं नव्हतं. पण, मला निवडून देणार का? कोण कोण मला निवडून देणार? हात वर करा", अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. यावेळी सभेला उपस्थितांनी हात उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.
- 02:26 PM • 22 Mar 2024'तुमच्या मेंदूची शीर का तडतडतेय', चित्रा वाघांचे संजय राऊतांवर बाण
"भाजपची अक्कल शोधण्याऐवजी स्वतःच्या मेंदूचा एमआरआय करून घ्या सर्वज्ञानीजी संजय राऊत! ‘आप’वाल्यांच्या भ्रष्टाचारावरून तुमच्या मेंदूची शीर का तडतडतेय ते समजून येईल. कारण भ्रष्टाचाराच्या धाग्याने घट्ट बांधलेले गेलेले तुम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहात", अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
वाघ यांनी पुढे म्हटलं आहे की, "या एका मुद्द्यावरून तुमचा याराना इतका घट्ट आहे की, भ्रष्टाचाराच्या कुरणात आरामात चरता यावं म्हणून इंडी आघाडीचा घाट घातला.. त्यामुळेच कायद्याचे पालन म्हणजे तुम्हाला नकोसं लोढणं वाटतंय."
"ज्या आम आदमी पार्टीने अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवली, त्याच पक्षाच्या मुख्यमंत्री, मंत्र्यांनी मद्य घोटाळा करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या. आता तपास यंत्रणांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढून पुरावे दिले", असे वाघ यांनी म्हटले आहे.
"कायद्यानुसार आपलं काम चोख बजावलं, तरी चोरांच्या उलट्या बोंबा मारणं सुरूच आहे. सर्वज्ञानीजी, तुम्हीही आपवाल्यांच्या सुरात सूर मिळवणं साहजिक आहे कारण तुमची आघाडीच जनतेसाठी लढणाऱ्या पक्षांची नसून ‘मिल बाँट के खाएंगे’वाल्या परिवारांची आहे", असे चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.
- 01:48 PM • 22 Mar 2024Manoj Jarange : 'फडणवीसांकडून मला तडीपार करण्याचे...', जरांगेंचा पुन्हा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : "माझ्यावर सर्वात जास्त गुन्हे हे बीड जिल्ह्यात दाखल झालेत आणि हे गुन्हे दाखल करून देवेंद्र फडणवीस हे बीड पोलिसांकडून माझ्यावर तडीपार कारवाई करण्याची शक्यता आहे", असे विधान मनोज जरांगे पाटील केले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी ते म्हणाले, "सरकार आणखी गुन्हे दाखल करून मला तडीपार करण्याचा प्रयत्नामध्ये आहे. मी सांगतो की मला कुठलाही फरक पडणार नाही. ना मी कुठे भ्रष्टाचार केलाय, ना मी कोणाचे पैसे खाल्ले आहेत. माझ्या पाठीमागे कोणी नसून; माझा समाज आहे."
"माझ्या समाजाला न्याय कसा मिळेल, माझा समाज मोठा कसा होईल यासाठी माझा प्रयत्न आहे. मी मरायला आणि जेलमध्ये जायला भीत नाही. असे गुन्हे दाखल करून छोटी छोटी कारणे समोर करून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न चालू आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगून मला तडीपार करण्याचे काम चालू केले आहे", असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
- 01:01 PM • 22 Mar 2024Arvind Kejriwal Live : केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका घेतली मागे
ईडीने अटक केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ईडीच्या अटकेच्या कारवाईला केजरीवालांनी आव्हान दिले. मात्र, रोज अव्हेन्यू सत्र न्यायालयात केजरीवाल यांच्या कोठडीवर सुनावणी होणार आहे. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या याचिकांमुळे केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली आहे.
- 11:31 AM • 22 Mar 2024'शाकीय आश्रम शाळांमध्ये दूध पुरवठ्यात घोटाळा', रोहित पवारांचा मोठा आरोप
'एका अज्ञात व्यक्तीने 11 फाईल माझ्या ऑफिसमध्ये पाठवल्या. गैरव्यवहाराच्या या 11 फाईलींचा अभ्यास मी केला आहे. शाकीय आश्रम शाळेत दुधाचा पुरवठा करण्याच्या कामात घोटाळा होत आहे. गैरव्यवहाराच्या 2 फाईल आज मी खुल्या करत आहे. दूध कंत्राटासाठी 80 कोटींची दलाली देण्यात आली. आंबेगावमधील एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे. कंत्राट महानंदाला दिलं असतं तर त्यांना मोठा फायदा झाला असात. समाजकल्याण विभागात 25 टक्के दलालीचा घोटाळा आहे.' असे गंभीर आरोप रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केले. - 10:52 AM • 22 Mar 2024"मी मोदीजींचा आभारी", केजरीवालांच्या अटकेनंतर राऊतांनी का मानले आभार?
केजरीवाल यांच्या अटकेबद्दल संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "इथपर्यंत पोहोचण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. मद्य घोटाळ्याची गोष्ट असेल, तर तुम्ही बघा जे इलेक्टोरल बाँड्स आहेत, जे भाजपच्या खात्यात हजारो कोट्यवधीच्या संख्येने जमा झाले आहेत. त्यातील किती लोकांवर ईडी-सीबीआयची कारवाई सुरू आहे आणि त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये भाजपच्या खात्यात गेले आहेत."
"याचा अर्थ गैरव्यवहाराचा पैसा तुमच्या पक्षाच्या खात्यात आला आहे. त्यामुळे भाजप अध्यक्षावर पीएमएलए कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. मद्य घोटाळ्याचे जे ठेकेदार आहे, जे या प्रकरणात सहभागी आहेत. त्यातील काहींनी भाजपला बाँडमधून पैसे दिल्याची माझी माहिती आहे. पण, तुम्ही अटक केसीआर यांच्या मुलीला केली."
"मनिष सिसोदिया, संजय सिंह यांना अटक केली. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. याला आम्ही लोकशाही म्हणत नाही. ही हुकुमशाही आहे. हे जंगलराज आहे. केजरीवालांच्या अटकेने आमचं मनोबल कमी झालेलं नाही. संपूर्ण विरोधकांना लढण्याचे प्रेरणा मोदींनी दिली आहे, त्याबद्दल मी मोदीजींचे आभार मानतो. उद्धव ठाकरे, शिवसेना आणि आम्ही सगळे केजरीवालांसोबत आहोत", असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
- 10:22 AM • 22 Mar 2024केजरीवालांच्या जागा १०० टक्के निवडून येतील - शरद पवार
शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी काही राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईबद्दल बोलताना पवार म्हणाले, "मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे. देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे. मोदी सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. त्यापाठोपाठ आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून ही अटक करण्यात आली आहे."
"प्रत्येक राज्यात असं धोरण असतं. राज्यांच्या मंत्रिमंडळाला हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. कदाचित त्यात काही चुकलं असेल. परंतु, त्यासाठी भाजपाने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा, यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावं."
"त्यांनी या प्रकरणी यापूर्वीच दोन-तीन जणांना अटक केली आहे. आता राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. राज्याचं धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे."
"अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. केजरीवालांच्या १०० टक्के जागा निवडून येतील."
"दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या. यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांच्या थोबाडीत लगावतील."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT