Maharashtra Opinion Poll : महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल

मुंबई तक

15 Apr 2024 (अपडेटेड: 15 Apr 2024, 02:12 PM)

maharashtra opinion poll 2024 NDA INDIA : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघापैकी कुणाला किती मिळू शकतात जागा, पहा ओपिनियन पोलचे आकडे काय?

महाविकास आघाडी आणि महायुतीला महाराष्ट्रात किती जागा मिळू शकतात?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळू शकतात?

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ अपडेट्स

point

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी लढाई

point

महाराष्ट्र ओपिनियन पोलमध्ये कुणाकडे कौल?

Lok Sabha election opinion poll 2024 maharashtra : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रात सर्वस्व पणाला लावताना दिसत आहे. पण, गेल्या काही वर्षात कुठल्याच निवडणुका न झाल्याने महाराष्ट्राचा कौल कुणाला, याचा अंदाज लागताना दिसत नाही. पण, गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या ओपिनियन पोलचे आकडे महायुती बरोबरच महाविकास आघाडीलाही शॉक्ड देताना दिसत आहे. पाहुयात कोणत्या पोलमध्ये कुणाला जास्त जागा? (Mahayuti Vs Maha Vikas Aghadi : Latest Maharashtra Lok Sabha Opinion Polls 2024)

हे वाचलं का?

सुरुवात करूयात इंडिया टुडे सी व्होटरच्या मूड ऑफ द नेशन ओपिनियन पोलने. फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या ओपिनियन पोलमध्ये महायुतीला धक्का बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 

या ओपिनियन पोलनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला 40.5 टक्के मते मिळतील, तर 48 पैकी 22 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या बाबतीत सांगायचं तर महाविकास आघाडीला 44.5 टक्के मते मिळतील आणि 48 पैकी 26 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे. 

एबीपी सी-व्होटरचा ओपिनियन पोल काय?

मार्च 2024 मध्ये समोर आलेल्या एबीपी सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्येही थोडे वेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 20 जागा मिळू शकतात. तर 42 टक्के मिळू शकतात. दुसरीकडे महायुतीला 28 जागा मिळू शकतात, मते 43 टक्के मिळू शकतात, असा अंदाज मांडण्यात आलेला आहे.

हेही वाचा >> भाजपला 14 ते 17 जागा; 'मविआ'ला किती? महायुतीला टेन्शन देणारा पोल 

न्यूज 18 च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची पिछेहाट होईल असे अंदाज आहेत. या ओपिनियने महायुतीला 41 जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. तर महाविकास आघाडीला 7 जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ ईटीजीचा ओपिनियन पोल...

या ओपिनियन पोलचे कौल वेगळे आहेत. महाराष्ट्रात महायुतीली 34-38 जागा, तर महाविकास आघाडीला 9-13 मिळू शकतात, असा अंदाज आहे.

हेही वाचा >> जयंत पाटलांनी 'आमचं ठरलंय' म्हणताच भाजपचं वाढलं टेन्शन! रात्रीत काय घडलं? 

इडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेमध्येही महायुतीला 53 टक्के मते, तर 35 जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीला 35 टक्के मतांसह 13 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. 

'लोकपोल'मध्ये महायुतीला धक्का

एप्रिल २०२४ च्या पहिल्या आठवड्यात समोर आलेल्या लोकपोलच्या ओपिनियन पोलने महाराष्ट्रात महायुतीला झटका बसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. लोकपोलच्य ओपिनियन पोलनुसार महायुतीला 21-26 जागा मिळू शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीला 23-26 जागा मिळू शकतात. तर 1 जागा अपक्षाला मिळू शकते. 

    follow whatsapp