Mumbai North Central : "वर्षाताई, स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या?"

मुंबई तक

• 04:01 PM • 30 Apr 2024

Varsha Gaikwad Prakash Ambedkar : उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरून वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड.

वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दल वंचित बहुजन आघाडीने काय मांडली भूमिका?

follow google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची काँग्रेसवर टीका

point

वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दल काय म्हटलं आहे?

Mumbai North Central Lok Sabha election 2024 : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून वंचित बहुजन आघाडीने टीका केली आहे. वर्षा गायकवाड यांना बळीची बकरी केली गेली आहे, असे म्हणताना वंचितने भूमिका मांडली आहे. 

हे वाचलं का?

वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दल एक पोस्ट वंचित बहुजन आघाडीने लिहिली आहे. यात काही मुद्दे मांडण्याबरोबरच वर्षा गायकवाड यांना प्रश्नही विचारले आहेत. 

वंचित बहुजन आघाडीचे वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीबद्दलची पोस्ट जशीच्या तशी

वर्षा गायकवाड यांना उत्तर―मध्य मुंबईमधील उमेदवारी म्हणजे बळीची बकरी !

वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ म्हणजे धारावी मतदारसंघातून लढतात आणि जिंकूनही येतात. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दक्षिण―मध्य मुंबईमधून खासदार म्हणून जिंकून आलेले आहेत. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून उत्तर―मध्य मुंबईमध्ये का उभ्या राहत आहे? हा प्रश्न आहे. साधे गणित असे की, जिथे वंचित बहुजन आघाडीची पकड अधिक आहे, तिथे आपण उभे राहणे आणि जिंकण्याची अधिक संधी घेणे हे कुठल्याही शेंबड्या पोराला समजू शकते. तर हे वर्षाताई यांना का समजू नये? ज्या मतदारसंघातून त्या उभ्या राहिल्या आहेत, त्या मतदारसंघात गेल्या ५ वर्षात त्या फिरकल्या सुद्धा नाही. शिवाय उत्तर―मध्य जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता बौद्ध उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडले आहे.

हेही वाचा >> ठाकरे, पवारांबद्दल सहानुभूतीची लाट दिसतेय का? मोदी म्हणाले... 

या सर्व पार्श्वभूमीवर वर्षाताईंना विचारायचे आहे की, आपण असा स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या? की भाजपाची ही नवीन खेळी आहे? आपले शिक्षक भरतीमधील घोटाळा बाहेर काढण्याबाबतचे संकेत तर नाही ना? काँग्रेसच्या नेत्यांना तुम्हाला जिंकून आणायचे आहे की, पाडायचे आहे?

काँग्रेसवाल्यांना माहीत होते की, वंचित बहुजन आघाडी ह्या मतदारसंघातून बौद्ध उमेदवार देणार आहे, म्हणून त्यांनी तुमची बळीची बकरी केली आहे.

हेही वाचा >> मोदींच्या 'भटकती आत्मा'वरून पवार भडकले, म्हणाले, "हो आहे, पण..."

तुमचे वडील ज्या मतदारसंघातून म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतून निवडून यायचे, तुम्ही निवडून यायच्या, ती जागा सोडून तुम्हाला उत्तर―मध्य मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी उमेदवारी देणे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लागलेल्या चौकश्या रोखणे आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का? तुमच्या पक्षातील एक नाराज मुस्लिम नेता तुम्हाला जिंकण्यात मदत करणार आहे की पाडण्यात ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मतदारांना द्यावी लागतील. त्यामुळे खरंच सर्वांनी मिळून तुमची बळीची बकरी केली आहे!
 

    follow whatsapp