MNS BJP Alliance : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचीही एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानातून मनसे महायुतीचे मनोमिलन जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (१९ मार्च) दिल्ली पोहोचले. राज ठाकरे यांची भाजपचे अमित शाह यांच्याशी रात्री चर्चा झाल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली.
संदीप देशपांडे काय म्हणाले, ते पहा...
"राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. ते कुणाला भेटताहेत? कशासाठी गेले आहेत, या गोष्टी काही तासांत स्पष्ट होतील. पण, एक गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगेन की राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल."
दक्षिण मुंबई मतदारसंघावर मनसेचा दावा असल्याच्या चर्चेबद्दल जेव्हा संदीप देशपांडे यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले, तेही वाचा...
हेही वाचा >> महायुतीत MNSच्या एंट्रीने कोणत्या मतदारसंघात फायदा होणार?
"असं आहे की बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राज ठाकरेंसोबत ते अनेकवर्षांपासून आहेत. आणि बाळा नांदगावकर जर दिल्लीत गेले... खासदार म्हणून गेले तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल, त्यात काही वाईट वाटण्यासारखी गोष्ट नाहीये."
संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याबद्दल बोलताना काही शब्द वापरलेत, ज्यातून मनसे महायुतीत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. ते म्हणाले आहेत की, "राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल."
हेही वाचा >> '...तर मी शिवसेना सोडेन', विजय शिवतारेंची खळबळ उडवून टाकणारी मुलाखत
यातील हिंदुत्वाच्या हिताचा हा शब्द मनसे महायुतीत जाणार असल्याचे संकेत देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा बदलला. इतकंच नाही, तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वाटचाल सुरू केली. त्यामुळे भाजप-मनसे जवळ येत असल्याची चर्चा कायम होत गेली. महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांत मनसे-भाजप एकत्र येतील अशी चर्चा होत गेली, पण निवडणुका झाल्या नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आलेले दिसणार आहेत.
ADVERTISEMENT