Solapur Lok Sabha Election : "राम सातपुते दोन लाख मतांनी पडतील", जानकरांचं भाकित

मुंबई तक

• 06:08 PM • 24 Apr 2024

Uttamrao Jankar, Lok Sabha election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाबद्दल जानकर यांचं मोठं भाकित.

उत्तम जानकर यांचे लोकसभा निवडणुकीबद्दल मोठं भाकित.

उत्तमराव जानकर यांच्यासोबत धैर्यशील मोहिते पाटील.

follow google news

बातम्या हायलाइट

point

राम सातपुते दोन लाख मतांनी पडतील -उत्तमराव जानकर

point

"धैर्यशील मोहिते पाटील चार लाख मतांनी जिंकतील"

point

एकनाथ शिंदेंना तीन जागा मिळतील, असे जानकरांचे भाकित

Solapur Lok Sabha Election 2024, Praniti Shinde Vs Ram Satpute : (नितीन शिंदे, माढा) सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने माळशिरसचे विद्ममान आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवलं आहे. विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडल्याने मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. अशातच उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचं टेन्शन वाढवणारं मोठं भाकित केलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी राज्यात ४० पेक्षा जास्त जागा जिंकेल, अशी राजकीय भविष्यवाणी जानकर यांनी केली आहे. (Uttamrao Jankar Prediction that, Ram Satpute will be defeated by 2 lakh votes in solapur lok sabha) 

हे वाचलं का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना ही निवडणूक जड जाईल, अशी स्थिती निवडणूक जाहीर होण्यापूर्वी होती. मात्र, आता या मतदारसंघातील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनीच भाजपला राम राम केल्याने माढा आणि सोलापूर मतदारसंघात भाजपला निवडणूक जड जाईल, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. त्यात आता उत्तमराव जानकर यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे. 

उत्तमराव जानकर राम सातपुतेंबद्दल काय बोलले?

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार करताना उत्तमराव जानकर फिरत आहे. एका प्रचारसभेनंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सोलापूरमध्ये काय स्थिती राहिल? असा प्रश्न जानकर यांना विचारण्यात आला. त्यावर जानकर म्हणाले की, "राम सातपुते दोनने (लाख) जातील. इथले (माढा लोकसभा मतदारसंघ) खासदार मात्र चारने (लाख) येतील."

हेही वाचा >> दोन नावांना मनसेचा विरोध, शिंदेंसमोर पेच?

महाविकास आघाडीचे किती उमेदवार निवडून येतील?

या प्रश्नाला उत्तर देताना उत्तमराव जानकर म्हणाले, "अजितदादांचा तर भोपळा दिसतोय, शिंदेंना दोन-तीन जागा दाखवत आहेत. पण, या राज्यातील वातावरण पाहिलं, तर निश्चितपणाने मला वाटत नाही की, या राज्यामध्ये दुसरं कुणाचं काही येईल. महाविकास आघाडी ताकदीने आणि 40 प्लस (४० पेक्षा जास्त जागा) येईल असं माझं मत आहे."

हेही वाचा >> 'तोंड दाखवायला जागा राहणार नाही, सगळंच बाहेर काढेन', शिंदेंचा ठाकरेंना इशारा

'अजित पवार, एकनाथ शिंदे चायना माल' 

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची उत्तम जानकर यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, "अॅपलचे मोबाईल समजून फडणवीसांनी यांना (एकनाथ शिंदे, अजित पवार) घेतलं, ते चायना निघाले. मी एक चायना मोबाईल घेतला होता. त्यावेळी त्यांना गॅरंटी मागितली होती. त्या मोबाईल दुकानदाराने मला सांगितलं होतं की, चायना मालाची गॅरंटी नसते. हे चले तो चाँद तक, नही तो रात तक. अशी या अजित पवार, एकनाथ शिंदेंचं आहे, हे सर्वेक्षणावरून दिसून येत आहे."

    follow whatsapp