Sambhaji Raje reaction on amended constitution : कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहु महाराज निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. छत्रपती शाहु महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचारासाठी आज कोल्हापुरात शिवशाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ''400 पार म्हणजे धोक्याची घंटा आहे. संविधान त्यांना बदलून टाकायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्यांना मोडून काढायचे आहे, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपवर टीका केली आहे. (sambhaji raje reaction on amended constitution chhatrapati shahu maharaj maha vikas aghadi candidate kolhapur lok sabha election 2024)
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीराजे शिवशाहू निर्धार सभेत बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी संविधान बदलाच्या चर्चेवर भाष्य केले. ''400 पार...तुम्ही कधी विचार केला आहे, 400 पार म्हणजे धोक्याची घंटा आहे. ते 272 का म्हणत नाही. तुम्हाला एकहाती सत्ता घ्यायची आहे ना हातात? एक हाती सत्ता घ्यायची असेल तर तुमचे 543 खासदार आहेत, आणि 543 खासदारांचे निम्मे करा ना तुम्ही, मग 272 होतात. 272 तुम्हाला अवघड होतं ना मग 300 म्हणा ना 400 का? 400 पार म्हणजे संविधान त्यांना बदलून टाकायचे आहे. त्यांना कायदा दुरूस्ती नाही, कायदा बदलायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेले आहे, हे मोडून काढायचे म्हणून हा 400 पार आकडा आहे, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपवर केली. तसेच सर्तक राहा सगळ्यांनी ही ऐतिहासिक निवडणूक आहे, दिशादर्शक निवडणूक असल्याचे आवाहन त्यांनी नागरीकांना केले.
हे ही वाचा : Lok Sabha 2024: माढ्यात खरी लढाई पवार विरुद्ध फडणवीस?
संभाजीराजे पुढे म्हणाले, अनेक लोक छत्रपती घराण्यावर टीका करायला लागले आहेत, छत्रपती शाहू महाराजांवर टीका करायला लागले आहेत. पण आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही कोण? छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज, ताराबाई राणी साहेब, राजर्शी छत्रपती शाहु महाराज यांच्यावर यांनी टीका केली. त्यांना काय फरक पडत नाही. पण मला फरक पडतो, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
मला वैयक्तिक एका गोष्टीचा फरक पडतो, चंदगडमध्य़े एक गृहस्थ आहेत, ते म्हणतात शाहु महाराजांवर टीका झाल्यानंतर म्हणतात, संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं? ज्या दुर्गराज रायगडने छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं, त्या ज्या दुर्गराज रायगडने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्या ज्या दुर्गराज रायगडने दु:ख सहन केले, ते म्हणजे शिवाजी महाराज तिकडे वारले तिथे त्यांची समाधी आहे. इतक्या 75 वर्षात कुठल्या नेत्याने एक फंड आणला नाही. या संभाजीराजेने जाऊन रायगड प्राधिकरण स्थापण केलं आणि साडे 600 कोटी फंड तिकडे आणून दिला. आणि गृहस्थ मला म्हणतो संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यांसाठी काय केलं, असे प्रत्युत्तर संभाजीराजे यांनी त्या नेत्याला दिले.
ADVERTISEMENT