Kalyan Lok Sabha : श्रीकांत शिंदेंना घेरण्याची तयारी? संजय राऊतांचे थेट मोदींना पत्र

विक्रांत चौहान

15 Apr 2024 (अपडेटेड: 15 Apr 2024, 10:24 AM)

Sanjay Raut, Shrikant Shinde, Foundation PM Modi : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या व्यवहारावरून संजय राऊत यांचे एकनाथ शिंदेंकडे बोट.

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या व्यवहाराची चौकशी करण्याची संजय राऊत यांची मागणी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीकांत शिंदे आणि संजय राऊत.

follow google news

बातम्या हायलाइट

point

श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेंना कोंडी पकडण्याची तयारी

point

संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

point

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

Sanjay Raut Letter To PM Modi : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना घेरण्याचे प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेने सुरू केल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनसंदर्भात थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले असून, गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजणार असंच दिसत आहे. (MP Sanjay Raut has written a letter to Prime Minister Narendra Modi in Srikant Shinde Foundation case)

हे वाचलं का?

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यात त्यांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी मोदींकडे केली आहे. 

संजय राऊत यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, "चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यात देखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत, मिंधे सरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत?", असा सवाल राऊतांनी केला. 

संजय राऊत यांनी मोदींना लिहिलेले तीन पानी पत्र वाचा...

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनसंदर्भात संजय राऊतांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र.
संजय राऊत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संजय राऊत यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रकरणातील प्रमुख मुद्दे

- ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे. 

- श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमार्फत गरजूंना रोख स्वरूपात मदत केली जाते. त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते, याचा खर्च कोट्यावधीमध्ये आहे. 

- हा खर्च नेमका कोणत्या माध्यमातून येतो, यावर धर्मदाय आयुक्त आणि प्रकाश टाकायला हवा, असे पत्र संजय राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेला आहे. 

- देशात अलीकडे 'चंदा दो धंदा लो' हे प्रकरण गाजत आहे. ठेकेदारांना काम देऊन भाजपच्या खात्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 8000 कोटी जमा केले आहेत.

- श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडे अशाच मार्गाने आलेल्या कोट्यावधींच्या रकमांचा मार्ग गुन्हेगारी स्वरूपाचा मनी लॉडरिंग प्रकरणाचा प्रथमदर्शनी दिसतो.

- हे गंभीर असून तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तात्काळ ईडी, सीबीआयकडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली आहे.

    follow whatsapp