Sharmila Thackeray, Lok Sabha 2024 : मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एकत्रित सभा पार पडली होती.या सभेतून पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. या सभेनंतर शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी देखील उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्ला चढवला होता. (sharmila thackeray on shivsena ubt udhhav thackeray lok sabha election 2024 mns raj thackeray pm narendra modi)
ADVERTISEMENT
शिवाजी पार्कवरील सभेच्या समाप्तीनंतर शर्मिला ठाकरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेत शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेवर हल्लाबोल केला होता. ''बाळासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, की मला जर काँग्रेससोबत जायला लागलं, तर मी माझा पक्ष बंद करेन, बाळासाहेबांची ती इच्छा पुर्ण करा आणि शिवसेना उबाठाला त्यांची....बाळासाहेबांची इच्छा पुर्ण करा, म्हणजे त्यात आलं काय ते, असे शर्मिला ठाकरे यांनी सूचक विधान केले.
हे ही वाचा : 'अजितचा स्वभाव मला माहितीय...', शरद पवार 'हे' काय बोलून गेले?
शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, मला असं वाटतं राज साहेबांनी खात्री बाळगलेली आहे. मोदीजीच पंतप्रधान होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच महाराष्ट्राच्या ज्या काही मागण्या आहेत.त्या मोदींसमोर मांडल्या आहेत, असे त्यांनी सांगितलं.
मला असं वाटतं की, लोकांनी लोकांच्या भल्याच राज्य आणावं.राज साहेबांनी कुठल्याही गोष्टीवर टीका न करता, लोकांच्या ज्या इच्छा आहेत, ज्या मागण्या आहेत,समाजाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे, असे देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT