TV9 C-Voter Exit Poll: पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात कोण जिंकणार?

रोहिणी ठोंबरे

01 Jun 2024 (अपडेटेड: 01 Jun 2024, 09:02 PM)

Maharashtra Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. तसंच त्यांची जोरदार चर्चाही झाली. यासर्वात चर्चेत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदार संघात कोण बाजी मारणार हे आपण TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जाणून घेऊयात.   

Mumbaitak
follow google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 (lok sabha election 2024) ची लगभग संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडले.  येत्या दोन दिवसात म्हणजेच 4 जून 2024 रोजी महाराष्ट्रातील लोकसभेच्या या मैदानात महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? याकडे सर्वांचं लक्ष लागून पाहिलेलं आहे. पण आज (1 जून) जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलनुसार, कुठल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा अंदाज जनतेला येईल. 
 
अशा परिस्थितीत, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. तसंच त्यांची जोरदार चर्चाही झाली. यासर्वात चर्चेत असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा मतदार संघात कोण बाजी मारणार हे आपण TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार जाणून घेऊयात.   

हे वाचलं का?

हेही वाचा : ABP C-Voter Exit Poll: महाराष्ट्रात BJPला मोठा हादरा, मविआची भरारी!

 
सातारा मतदारसंघात भाजकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरूद्ध लढत आहे. पण आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या माहितीनुसार मविआचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर, भाजपा महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचं दिसतंय आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 

एक्झिट पोलनुसार जनतेने दिलेला कौल खरंच ठरेल की यामध्ये काही बदल घडतील हे आता 4 जून 2024 रोजी लोकसभ निवडणुकीच्या दिवशीच कळेल.

हेही वाचा : Exit Poll : 'इंडिया आघाडी'ला बहुमत मिळणार? महाराष्ट्रात किती मिळणार जागा?

एबीपी-सी व्होटरनुसार भाजपप्रणित NDA ला तब्बल 22 ते 26 जागा मिळू शकतात. पक्षनिहाय विचार केल्यास महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळू शकतात. 

भाजप - 17 
शिवसेना (शिंदे गट)- 06 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 01  

असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 

दुसरीकडे याच एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला राज्यात एकूण 23 ते 24 जागा मिळू शकतात. हा आकडा इंडिया आघाडीसाठी नक्कीच दिलासादायक ठरू शकतो. 

हेही वाचा : 'महाराष्ट्र BJP चा सगळा खेळ बिघडवेल', कोणी सांगितला नेमका आकडा?

काँग्रेस - 08  
शिवसेना (ठाकरे गट)- 09
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 06

याशिवाय 1 जागा ही अपक्षाला मिळू शकते असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

 

    follow whatsapp