Lok Sabha Election 2024 : 'फडतूणवीसचे नोकर नाही...', उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका

रोहिणी ठोंबरे

18 May 2024 (अपडेटेड: 18 May 2024, 04:40 PM)

Shivsena UBT vikroli rally : आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महायुती, मविआकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी विक्रोळीतील त्यांच्या जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

'फडतूणवीसचे नोकर नाही...', उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा

point

गणपत गायकवाड प्रकरणावर बोलत पुन्हा फडणवीसांना डिवचलं

मुंबई : Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज (18 मे) थांबणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नाशिकसह नंदूरबारमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावतील. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महायुती, मविआकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशावेळी शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे यांनी विक्रोळीतील त्यांच्या जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली. (uddhav thackeray on devendra fadnavis he said fadtunvis to him in mumbai vikroli Campaign rally)

हे वाचलं का?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूणवीस म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसंच ठाकरेंनी पोलिसांनाही जाहीर इशारा दिला. 'आमच्या शिवसैनिकांवर आणि महिलांवर हात उचलणाऱ्या पोलिसांचं काय करायचं हे मी सत्ता आल्यावर पाहून घेणार आहे', असंही ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा : मुंबई Tak चावडी : 'भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देशासोबत गद्दारी...'

'फडतूणवीसचे नोकर नाही...', उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा

'गद्दारांच्या पालख्या किती काढायच्या, हरामखोरांच्या पालख्या किती काढायच्या... आजपर्यंत पालखीत बसवून आम्ही तुम्हाला मिरवलं... ज्यांना ज्यांना मिरवलं ते दिल्लीला गेले. त्यांनी आपली शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून राजकारणात आपल्याला त्यांना संपवावंच लागेल आणि हेच करण्यासाठी मी इथे आलोय.

हेही वाचा : 'शरद पवारांनी मोठ्या चुका केल्या'; पृथ्वीराज चव्हाण असं का म्हणाले?

मला आता आपले उमेदवार सांगत होते, काल आपल्या शिवसैनिकांनी जी काय धाड टाकली त्यामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना आणि महिलांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत. बघतो मी पुढे काय करायचं ते... आणि पोलिसांनासुद्धा सांगतोय की, तुम्ही भाजपचे किंवा फडतूणवीसचे...फडणवीसचे नोकर नाही आहात, तुम्ही जनतेचे सेवक आहात. हे सरकार तर जातंय नक्कीच, उद्या आमचं सरकार आलं की तुमचं काय करायचं तो निर्णय घेतल्याशिवाय मी राहणार नाही. हा पोलिसांना मी जाहीर इशारा देत आहे' असं उद्धव ठाकरे त्यांच्या विक्रोळीतील सभेत स्पष्टच बोलले. 

हेही वाचा : मुंबईतून PM मोदींचं शरद पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले...

गणपत गायकवाड प्रकरणावर बोलत पुन्हा फडणवीसांना डिवचलं

'कल्याणमध्येसुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्याने अनेकदा त्याच्या वरिष्ठांकडे दे फडतूणवीस आहेत… फडतूस काय शब्द आहे?… माझी जीभ अडकतेय.. फडतूणवीस… फडणवीस... हा, तुम्ही टाळ्या वाजवू नका. मला करेक्ट करा… फडतूणवीस… फडणवीस यांच्याकडे गणपत गायकवाडने तक्रार केली होती. पण त्याचं ऐकलं नाही. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागला. ज्यांच्याबद्दल तक्रार होती त्यांना मोदी आता मांडीवर घेऊन फिरत आहेत. हे लाजीरवाणं चित्र देशात कुठेच नसेल. ते महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे,' असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला.

    follow whatsapp