Varsha gaikwad, North Central Mumbai seat :उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने या जागेवरून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड लोकसभा लढवताना दिसणार आहे. दरम्यान आता वर्षा गायकवाड यांच्याविरोधात महायुती नेमका कोणता उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Varsha gaikwad contest lok sabha election 2024 north central mumbai seat congress declare cadidate)
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक समितीने एक पत्रक काढून वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून वर्षा एकनाथ गायकवाड लोकसभा निवडणुक लढवतील याबाबतची माहिती पत्रातून देण्यात आली आहे.
हे ही वाचा : 'गावरान मराठीमध्ये बोलणारा...', पवारांनी विखेंना घेरलं!
वर्षा गायकवाड या सध्या मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. तीन वेळा त्या खासदार राहिल्या आहेत. एकनाथ गायकवाड यांच्या पोटी जन्मलेल्या वर्षा या आंबेडकरवादी बौद्ध कुटुंबातील आहेत. मुंबईतील धारावी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या महाराष्ट्र विधानसभेच्या चार वेळा सदस्य आहेत.
वर्षा यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पर्यटन आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री यासह विविध मंत्रीपदे भूषवली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम करत शिक्षणाशी संबंधित खात्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
हे ही वाचा : माढ्यात पवारांची ताकद वाढली, आणखीण एक धनगर नेता राष्ट्रवादीत
मुंबई उत्तर मध्य मतदार संघासाठी नसीम खान, भाई जगताप यांच्यासह इतर काही नावांची चर्चा होती. मात्र अखेर वर्षा गायकवाड यांच्या मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. खरंतर वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईसाठी अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा झाल्याने वर्षा गायकवाड काहीशा नाराज होत्या. मात्र आता मुंबई उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देऊन त्यांची नाराजी दुर केल्याची माहिती आहे.
वर्षा गायकवाड या त्यांच्या भक्कम राजकीय पार्श्वभूमीसाठी ओळखल्या जातात. मुंबईत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि बीएमसी निवडणुका आणि मुंबईतील लोकसभा निवडणुकीत पक्षाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. तर भाजपच्या पूनम महाजन या येथून विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून नेमका कोणता उमेदवार जाहीर होतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT