Sanjay Raut On PM Modi : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रापासून अनेक राज्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुकांच्या लढती अत्यंत अटीतटीच्या होत आहेत. अशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यालाही वेग आला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनीही सामनाच्या रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गेल्या 10 वर्षात देशाला काय मिळालं? असा थेट सवालही त्यांनी या सदरातून केला आहे. (What did the country get during Modi's 10 years tenure Sanjay Raut's attack by directly on PM Modi)
ADVERTISEMENT
'कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळालं?'- संजय राऊत
संजय राऊतांनी आपली आक्रम भूमिका मांडत लिहिलं आहे की, 'कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे सध्या विकास, लोककल्याण, गरिबी हटवण्यावर बोलू लागले आहेत. त्यांचे बोलणे वरवरचे आहे, पण देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मोदी यांनी देशाची सूत्रे 2014 साली हाती घेतली तेव्हा देशावर 49 लाख कोटी कर्ज होते. 2024 साली कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर जाऊन पोहोचला, पण या कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळाले? देशातील मोठा वर्ग गरिबी, बेरोजगारीशी संघर्ष करत आहे व महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फेल ठरली आहे?'
'मोदी हे व्यापारी आहेत...'
पुढे राऊतांनी म्हटलंय की, 'मोदी यांना सामाजिक भान नाही. राष्ट्रीय विचार त्यांच्याकडे नाही. सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती म्हणजे राष्ट्रकारण नाही. मोदी यांना अर्थशास्त्र अजिबात कळत नाही. मोदी हे व्यापारी आहेत असे ते स्वतःच सांगतात, पण स्वतःचा गल्ला मोजणे वेगळे व देशाला आर्थिक दिशा देणे वेगळे. मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत जो लहरीपणा दाखवला तो धक्कादायक आहे.'
'मोदी सरकारने आर्थिक ढाचाच उद्ध्वस्त केला'
'मोदी सरकारने कर दहशतवादाचा वापर करून उद्योग-व्यापारास हानी पोहोचवली आहे. केंद्र सरकारने ‘एक देश, एक कर’ हे धोरण राबवून ‘जीएसटी’नामक राक्षस लोकांच्या मानेवर बसवला. जीएसटीच्या नावाखाली होणारी लूट म्हणजे एक प्रकारचा कर दहशतवाद आहे. जीएसटीमुळे राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर, संघराज्य पद्धतीवर गदा आली. राज्यांना केंद्राचे गुलाम केले. राज्यांच्या पैशांवर मोदी सरकार वारेमाप उधळपट्टी करीत आहे.
व्यापारी व छोट्या उद्योगांना छळण्यासाठी ‘जीएसटी’चा वापर करण्यात आला व हे उत्तम अर्थ आरोग्याचे लक्षण नाही. दबाव आणून रिझर्व्ह बँकेला हवा तसा निर्णय घ्यायला लावणारे मोदी सरकार देशाचा आर्थिक ढाचाच उद्ध्वस्त करत आहे', अशी जहरी टीकाही संजय राऊतांनी केली.
ADVERTISEMENT