Modi Cabinet: महाराष्ट्रातून कोण बनणार मंत्री.. शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात नेमकं काय ठरलं?

मुंबई तक

• 08:17 PM • 08 Jun 2024

Modi Cabinet and minister from Maharashtra: नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. पण त्याआधी महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बऱ्याच बैठका सुरू आहेत.

शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात नेमकं काय ठरलं?

शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात नेमकं काय ठरलं?

follow google news

Modi Cabinet: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 नंतर नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधी मंत्रिमंडळाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यातही महाराष्ट्राची चर्चा ही अधिकच जोमाने सुरू आहे. एनडीएच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ स्थापनेबाबत आता अनेक बैठका सुरू झाल्या आहेत. मंत्रिपदांची विभागणी सुरू असून त्यासाठी एनडीएतील पक्षांशी सातत्याने भाजप नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. (who will be made minister from maharashtra in modi cabinet round of talks between eknath shinde devendra fadnavis and ajit pawar continues)

हे वाचलं का?

महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊनही मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरू आहे. एनडीएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक मंत्रिपद देण्याची चर्चा आहे. चर्चेतून यावर एकमत होण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, 'सहानुभूती होती तर...'

एनडीएतील मित्रपक्ष मोदींच्या पाठिशी

मंत्रिमंडळाच्या चर्चेदरम्यान, एनडीएमध्ये समाविष्ट असलेले पक्ष मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी ग्वाही देत आहेत. भाजप यंदा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकलं नाही. त्यामुळे त्यांना आघाडीतील पक्षांचे महत्त्व चांगलेच उमगले आहे. यामुळेच मोदी या विजयाला एनडीएचा मोठा विजय म्हणत आहेत.

विरोधकांचा उत्साह दुणावला

खरे तर लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दिल्ली ते मुंबई अशा बैठकांच्या अनेक फेरी सुरू आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक पक्ष पुढील रणनीती आखत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात चांगली कामगिरी केल्यानंतर काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. एनडीएला महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, तर विरोधकांना हल्ला चढविण्याची संधी मिळाली आहे.

हे ही वाचा>> 'मी एक मिनिटंही शांत बसलो नव्हतो..', फडणवीसांचं मोठं विधान..

त्याचवेळी महाराष्ट्र भाजपचे नेते एकजुटीने एकत्र पुढे जाण्याबाबत बोलत आहेत आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकत्रितपणे चांगली कामगिरी करण्याचा दावा करत आहेत.

भाजपचे नुकसान...

2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठे आव्हान अपेक्षित होते. त्यामुळे पीएम मोदींनी स्वतः महाराष्ट्रात 19 सभा आणि रोड शो केले, पण इतक्या सभा घेऊनही महाराष्ट्रात भाजपला केवळ 9 जागा जिंकता आल्या, तर एनडीएला केवळ 17 जागा जिंकता आल्या.

आता या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकूणच एका दिवसानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचे चित्रही स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय लढाईला तोंड फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    follow whatsapp