'अजितदादांनी 2019 मध्येच आम्हाला BJP मध्ये...', राणाजगजितसिंह पाटलांचा मुलाचा गौप्यस्फोट

मुंबई तक

12 Apr 2024 (अपडेटेड: 12 Apr 2024, 10:13 PM)

Ranajagjitsinha Patil Son: अजित पवार यांनी आधी आम्हाला भाजपामध्ये पाठवले व नंतर ते स्वतः भाजपसोबत आले. असं विधान धाराशिव लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी केलं आहे.

follow google news

Lok Sabha Election 2024 NCP Ranajagjitsinha Patil: गणेश जाधव, धाराशिव: धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी एका प्रचार सभेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. 'नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आणि अजित पवार यांच्या सहमतीनेच 2019 मध्ये डॉ. पाटील परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.' असं विधान राणाजगजितसिंह यांच्या मुलाने जाहीर सभेत केलं आहे. (lok sabha election 2024 ajit pawar first sent us to bjp and then he himself came with bjp ranajagjitsinha patil son malhar patil statement)

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले मल्हार राणाजगजितसिंह पाटील?

'अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवलं आणि नंतर ते स्वतः भाजपसोबत आले. नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून व अजित पवार यांच्या सहमतीने आम्ही 2019 ला राष्ट्रवादी सोडली होती त्यानंतर अजित पवार भाजपसोबत आले. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका..' 

'आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप तर हातात धनुष्यबाण आहे  आम्ही सर्वजण मिळून महायुती लोकसभा मतदारसंघात महायुती वाढवू.' असं वक्तव्य त्यांनी एका प्रचारसभेत केलं आहे.

ओमराजेंच्या टीकेला मल्हार पाटलांकडून उत्तर?

दरम्यान, ओमराजे यांनी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशी टीका केली की, 'पाटील कुटुंबाने अजित पवार यांना कंटाळून राष्ट्रवादी सोडली होती.' ओमराजेंच्या याच टीकेला उत्तर आता मल्हार पाटील यांनी दिली असल्याची चर्चा धाराशिवमध्ये सुरू आहे.

    follow whatsapp