मुंबई: एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचे आयुष्य रुळावर आले आहे. राखीचा पती आदिल खान याने अखेर अभिनेत्रीसोबतचे लग्न मान्य केले आहे. आधी आदिलने राखीसोबतचे लग्न स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला, पण नंतर त्याने राखी आणि त्याचे लग्न जगासमोर स्वीकारून या साऱ्या नाटकाला पूर्णविराम दिला. पण तुम्हाला माहित आहे का की आदिलने सलमान खानच्या सांगण्यावरून राखीसोबतचे लग्न स्वीकारले आहे.
ADVERTISEMENT
सलमान खानने आदिलला फोन केला
आदिलने राखी आणि त्याचे लग्न खोटे असल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर सलमान खान त्याला काही बोलला, त्यानंतर आदिलने राखीला जगासमोर पत्नी म्हणून स्वीकारले. मीडियाशी बोलताना राखीने सांगितले की, आदिलला सलमान खानचा फोन आला होता, त्यानंतर त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आहे. राखीने सांगितले की, भाई (सलमान) देखील आदिलला भेटला आहे. त्याला भाईचा फोनही आला. भाई असल्यानंतर कोणी बहिणीशी लग्न करण्यास नकार देऊ शकतो का? असं राखी मीडियाशी बोलताना म्हणाली.
सलमान आदिलला काय म्हणाला?
आदिलनेही याबाबत माहिती दिली की, सलमान खानने त्याला फोन करून त्याच्याशी बोलला. आदिल म्हणाला, हो सलमान खानचा कॉल आला होता. जे काही असेल ते स्वीकारायला सांगितले. स्वीकारायचे असेल तर स्वीकार नाहीतर नकार दे पण जे सत्य आहे ते स्वीकार आणि सामोरे जा. यानंतर राखी पुढे म्हणते, दुसरीकडून प्रेशर आलं तेंव्हा ऐकलं जरा बायकोचाही दबाव मानत जा.
आदिलने राखीची माफी मागितली
त्याचवेळी, दुसर्या व्हिडिओमध्ये मीडियासोबत बोलताना आदिल म्हणाला, मला हे लग्न मान्य आहे. आदिलने असेही सांगितले की होय त्याचे राखीशी लग्न झाले आहे आणि राखी त्याची पत्नी आहे. यानंतर आदिल हात जोडून राखीची माफीही मागतो. त्याचवेळी राखी म्हणते की, ‘सलमान खानने माझे घर सेटल केले आहे. आदिल, माझ्या नवऱ्याने होकार दिला आहे. आदिलने लग्नाला होकार दिल्यानंतर राखीचा आनंद परतला आहे. तिला आता सुखी वैवाहिक जीवन जगायचे आहे, असं ती म्हणते.
ADVERTISEMENT