Anant Ambani-Radhika Merchant Wedding Update Live : जिओ वर्ल्ड सेंटरला पोहोचणार अनंत अंबानींची वरात

मुंबई तक

12 Jul 2024 (अपडेटेड: 12 Jul 2024, 05:02 PM)

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live Event : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धुमधडाक्यात तयारी...दिग्गज पाहुणे लावणार हजेरी... वाचा सर्व लाईव्ह अपडेट्स...

Mumbaitak
follow google news

Anant Ambani-Radhika Merchant Grand Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं आज शाही थाटात लग्न होत आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न असलेल्यामुळे देश-विदेशातील पाहुण्यांनी विशेष हजेरी लावली आहे. 

दोघांना आशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील लग्न सोहळ्यात उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्यापासून ते तिथे उपस्थित राहणाऱ्या दिग्गज पाहुण्यापर्यंतचे सर्व अपडेट्स आज या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचा..

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:16 PM • 12 Jul 2024
    Anant-Radhika Wedding Live : अनंत-राधिकाच्या लग्नाचं असं असणार शेड्युल...
    • दुपारी 3 वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. 
    • वरमालाचा विधी रात्री 8 वाजता संपन्न होईल. त्यानंतर अनंत आणि राधिका रात्री 9.30 वाजता सप्तपदी घेतील. 
    • गेल्या काही महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाचा जल्लोष सुरू आहे. 
    • फेब्रुवारी महिन्यात जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. हा संपूर्ण कार्यक्रम तीन दिवसांचा होता.
    • त्यानंतर जून महिन्यात क्रूझवर आलिशान पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आता लग्नापूर्वी 3 जुलैपासूनच विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.
    • मामेरू, संगीत, हळद, मेहंदी, शिव-शक्तीची पूजा असे विविध कार्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहेत. 
  • 04:08 PM • 12 Jul 2024
    सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष मुंबईत पोहोचले

    अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष 'जय वाय. ली' काल रात्री मुंबईत पोहोचले.

     

  • 02:32 PM • 12 Jul 2024
    Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी नीता अंबानींचा व्हिडीओ समोर

    मुलगा अनंत अंबानीच्या लग्नापूर्वी रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यात वाराणसी या पवित्र शहराला अंबानी कुटुंब विशेष वंदन करणार आहेत.

     

follow whatsapp