Hardik Pandya Jasmin Walia Dating : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने नुकताच पत्नी नताशा स्टॅनकोविक सोबत घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हार्दिकने या घटस्फोटाची माहिती दिली होती. यानंतर हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडल जातं होतं. मात्र आता सध्या एका ब्रिटीश सिंगरला तो डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.जास्मिन वालिया असे या ब्रिटीश सिंगरचे नाव आहे. त्यामुळे जास्मिन वालिया कोण आहे? हे जाणून घेऊयात. (hardik pandya british singer jasmin walia vocationning together dating rumour team india cricketer natasa stankovic divorce)
ADVERTISEMENT
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे विभक्त झाले आहेत. नुकतीच या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. या घटस्फोटानंतर नताशा सर्बियातील तिच्या घरी निघून गेली होती. तिच्या सोबत तिचा मुलगा देखील होता. तर हार्दिक पंड्या सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तो सध्या ग्रीसमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसला आहे.
हे ही वाचा : Supriya Sule: 'भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि...', सुप्रिया सुळेंचं 'ते' विधान प्रचंड चर्चेत
दरम्यान हार्दिक पंड्या वेकेशन मोडवर असताना त्याने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोनंतर त्याचे नाव गायिका जास्मिन वालियासोबत जोडले जाऊ लागले. खरं तर जास्मिन वालियाने पांड्याच्या काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो शेअर केले होते, जे ग्रीसमधील मायकोनोस बेटावरील आहेत. त्याचा एक फोटो स्विमिंग पूलच्या बाजूचा आहे. या फोटोनंतर, दोघांनी एकत्र सुट्टी साजरी केल्याची अफवा उडू लागली आहे.
वास्तविक, पंड्या आणि वालिया या दोघांचे फोटो एकाच ठिकाणचे म्हणजेच एकाच रिसॉर्टचे आहेत. वालिया तिच्या फोटोत निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत होती, तर पंड्यानेही शर्टसोबत त्याच रंगाचा टी-शर्ट घातला होता. आता अशीही चर्चा आहे की, दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवत आहेत.
कोण आहे जास्मिन वालिया?
जास्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आहे, तिचा जन्म इंग्लंडमधील एसेक्स येथे झाला आहे. तिचे आई वडील हे भारतीय वंशाचे होते. जस्मिनला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. तिने काही वर्षे नॅटवेस्ट बँकेत ग्राहक सल्लागार म्हणून काम केलंय.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : राहुल गांधीसमोर ठाकरे झुकले? व्हायरल फोटोमागचे सत्य आलं समोर
जस्मिन वालिया हिला ‘द ओन्ली वे इन एसेक्स’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये तिने 2010 मध्ये पहिल्यांदा काम केले होते. 2014 मध्ये, जस्मिनने स्वतःचे YouTube चॅनल सुरू केले.2015 मध्ये जस्मिन ब्रिटिश टीव्ही शो ‘देसी रास्कल्स 2’ मध्ये दिसली होती. 2017 मध्ये, जस्मिनने तिचे ‘बॉम डिग्गी’ गाणे रिलीज केले, जे 2018 च्या बॉलिवूड चित्रपट ‘सोनू के टीटू की स्वीटी’ च्या साउंडट्रॅकसाठी रिमेक केले गेले. तिने ‘बिग बॉस 13’ फेम असीम रियाझसोबत ‘नाइट्स अँड फाईट्स’मध्ये काम केले.
दरम्यान ब्रिटीश गायक ही हार्दिकला इन्स्टावर फॉलो करते आणि क्रिकेटर हार्दिक देखील जस्मिनच्या अनेक इन्स्टा पोस्टला लाईक करत असतो. सध्या हार्दिक आणि जस्मिनच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT