अभिनेते Mithun Chakraborty ना केलं अचानक रुग्णालयात दाखल

मुंबई तक

10 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 12:33 PM)

Mithun Chakraborty Hospitalised: अभिनेता-राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल

मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल (Mithun Chakraborty)

follow google news

Mithun Chakraborty: कोलकाता: अभिनेता आणि राजकारणी मिथुन चक्रवर्तीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छातीत दुखू लागल्याने आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने मिथुन यांना तात्काळ नजीकच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (73 year old actor mithun chakraborty was admitted to the hospital due to discomfort and chest pain)

हे वाचलं का?

मिथुन चक्रवर्ती हे 73 वर्षांचे आहेत. आज (10 फेब्रुवारी) सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले तसंच त्यांना थोडं अस्वस्थही वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला होता. 'मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याचा आनंद वाटतो. ही एक अतिशय आश्चर्यकारक आणि वेगळी अनुभूती आहे. मला खूप बरे वाटत आहे.' असं ते म्हणाले होते.

हे ही वाचा>> 12th Fail: IRS अधिकारी बनण्यासाठी डॉक्टरी सोडणाऱ्या श्रद्धा जोशी कोण?

'इतके प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार माझ्या जगभरातील चाहत्यांसाठी आहे ज्यांनी मला निस्वार्थ प्रेम दिले आहे. माझा हा पुरस्कार सर्व हितचिंतकांना जातो.' अशी प्रतिक्रिया चक्रवर्ती यांनी दिली होती.

काश्मीर फाइल्ससाठी मिळाला पुरस्कार 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये मिथुन सुमन घोषच्या सुपरहिट बंगाली चित्रपट काबुलीवाला मध्ये दिसले होते. तर 2022 मध्ये, त्याने विवेक अग्निहोत्रीच्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात निवृत्त IAS ची भूमिका केल्याबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

हे ही वाचा>> घटस्फोटानंतर Esha Deol च्या 'त्या' पुुस्तकाची का होतेय एवढी चर्चा?

मिथुन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते आहेत, जे डिस्को डान्सर म्हणूनही ओळखले जातात. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी परिवार, मेरा यार मेरा दुश्मन, बात बन जाए आणि दीवाना तेरे नाम का यांसारख्या सुमारे 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

    follow whatsapp