Abhishek Bachchan And Aishwarya Rai Viral Photo: गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या होत्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात अभिषेक-ऐश्वर्या एकत्रित स्पॉट न झाल्याने दोघांच्या नात्यात आलबेल नसल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं. परंतु, आता एका व्हायरल फोटोने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत अभिषेक-ऐश्वर्या एका लग्नसोहळ्यात एकत्रित स्पॉट झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या-अभिषेक या दोघानींही काळ्या रंगाचं आऊटफीट घातलं होतं. एका फोटोत ऐश्वर्या नवरदेवाला शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसच अभिषेक-ऐश्वर्याचे धूम 2 चे को स्टार ऋतिक रोशननेही त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. ऋतिकची गर्लफ्रेंड सबानेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
हे ही वाचा >> Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी, 'त्या' पत्रात नेमकं काय म्हटलंय?
दिग्गज अभिनेता जितेंद्रही त्यांची मुलगी एकता कपूरसोबत या लग्नसोहळ्यात सामील झाले होते. जितेंद्र यांनी गुलाबी रंगाचा सूट घालून सर्वांनाच मंत्रमुग्ध केल्याचं या व्हायरल फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. तसच आदित्य रॉय कपूरने ब्लेझर आण ट्राऊझरसोबत सफेद रंगाचा शर्ट परिधान करून लग्नसोहळ्याची शोभा आणखी वाढवली. तर प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने हिरव्या रंगाच्या साडीसोबत मॅचिंग ब्लाऊज घालून जबरस्त पोज दिल्याचंही समोर आलं आहे.
हे ही वाचा >> Rahul Narwekar: 'मागे तुम्ही वाट मोकळी केली म्हणून नार्वेकर अध्यक्ष झाले', CM फडणवीसांनी नाना पटोलेंना डिवचलं
या लग्नसोहळ्याचे फोटो वेडिंग प्लानर या ऑफीशियल हँडलवर शेअर करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, रिसेप्शनमध्ये बॉलिवूडची रॉयल्टी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या उपस्थितीने चार चांद लावले. तसच क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर आणि हॉकीचे दिग्गज धनराज पिल्लेही या सोहळ्यात सामील झाले.
ADVERTISEMENT