बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप सोडल्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया ‘नेटफ्लिक्स’च्या ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.
ADVERTISEMENT
‘हार्ट ऑफ स्टोन’ हा स्पाय थ्रिलर सिनेमा असून, या सिनेमात ती ‘वंडर वुमन’ स्टार अभिनेत्री गॅल गॅडोटसोबत काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर या सिनेमात ‘५० शेड्स ऑफ ग्रे’तील अभिनेता जेमी डोर्नन सुद्धा असणार आहे.
नेटफ्लिक्स निर्मित गुप्तहेरीवर आधारित असलेल्या या सिनेमाचं दिग्ददर्शन टॉप हार्पर करणार आहे. सध्या तरी ‘हार्ट ऑफ स्टोन’बद्दल जास्तीची माहिती नाही. मात्र या सिनेमात गॅल गॅडोट गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.
आलिया भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटात भूमिका साकारलेल्या असून, अलिकडेच तिचा गंगुबाई काठियावाडी चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलेलं आहे. गंगुबाई काठियावाडीतील अभिनयाबद्दल आलियाचं तिच्या चाहत्यांकडून कौतूकही होताना दिसत आहे.
झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या ‘गली बॉय’मधील आलियाची भूमिका चांगलीच गाजली होती. हा सिनेमाचा प्रीमियर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. राझी सिनेमातील कामाबद्दलही आलियाचं प्रचंड कौतूक झालं होतं. त्यानंतर आता ती थेट हॉलिवूडमध्ये पर्दापण करत असून, तिच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
ADVERTISEMENT