अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमा रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. तर अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. येत्या 18 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
अमिताभ बच्चन आणि नागराज मजुंळे यांच्या ‘झुंड’ सिनेमासाठी प्रेक्षक फार आतुर आहेत. नागराज मंजुळे यांचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. अमिताभ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय या चित्रपटाला अजय आणि अतुलने संगीत दिलं आहे.
गेल्या वर्षी या सिनेमाचा टीझरही लाँच करण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तेलंगणातील उच्च न्यायालकडून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या बंदीला सर्वोच्च न्यायालानेही मान्यता दिली होती. या सिनेमावर कॉपी राईटचा दावा ठोकण्यात आला होता.
‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. विजय बरसे यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवत एक फुटबॉल टीम बनवली होती. त्यांच्या या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. अखेर या सिनेमाची रिलीज डेट ठरली असून 18 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ADVERTISEMENT