Time100 Reader Poll :
ADVERTISEMENT
अनेक दिग्गज व्यक्तिमत्वाना मागे टाकून शाहरुख खानने (Bollywood actor Shah Rukh Khan) TIME100 रिडर पोलमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आपणच बादशाह असल्याचं शाहरुखने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. TIME च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या वार्षिक यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी योग्य वाटणाऱ्या व्यक्तींना वाचकांनी मतदान केलं होतं. यात 12 लाखांपैकी जवळपास 4 टक्के मत मिळवून शाहरुख खानने हे अव्वल स्थान पटकावलं आहे. (Bollywood actor Shah Rukh Khan won the 2023 TIME100 poll)
शाहरुख खानशिवाय या यादीत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, प्रिन्स हॅरी, अभिनेता मिशेल योह, अॅथलिट सेरेना विल्यम्स, मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांच्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा : शाहरूख खानने खरेदी केली ‘इतकी’ महागडी कार, किंमत एकूण बसेल धक्का
शाहरुख खान हा भारतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आणि आंतरराष्ट्रीय आयकॉन देखील आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है आणि इतर प्रेमावर आधारिक ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून शाहरुखने बॉलिवूडचा रोमँटिक हिरो म्हणून ओळख मिळवली आहे. शाहरुख खानचा अलीकडेच पठाण चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतातील कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. याशिवाय शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक देखील आहे.
महसा अमिनी दुसऱ्या स्थानावर :
इराणमध्ये गेल्या काही वर्षांत महिला त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी त्यांच्या मूलभूत हक्कांची मागणी केली आहे. याच महिलांची नायिका ठरलेली महसा अमिनी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इराणमध्ये मागील काही काळात महिलांच्या ड्रेस कोडबाबतच्या कायद्याला बराच विरोध झाला. अवघ्या 22 वर्षांच्या असलेल्या महसा अमिनी या विरोधात आघाडीवर होती. इराणच्या महिलांच्या ड्रेस कोडच्या विरोधात तिने केस कापले होते. ती कापलेले केस आणि हिजाबशिवाय सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरायची. पण एकदा तिला पोलिसांनी अटक केली, यातच तिचा एक दिवस पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
हेही वाचा : Bollywood : आलिया, प्रियांका, कतरिनाच्या चित्रपटात शाहरुख खान, कोणत्या भूमिकेत दिसणार?
याशिवाय या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर सक्सेसचे ड्यूक आणि डचेस प्रिन्स हॅरी आणि मेघन हे आहेत. तर फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीला पाचवे स्थान मिळाले आहे. टाइम एडिटर 13 एप्रिल 2023 ला TIME100 च्या यादीसाठी त्यांचे मत जाहीर करणार आहेत.
ADVERTISEMENT