ADVERTISEMENT
बिग बॉस 13 फेम शहनाज गिल सध्या खूपच चर्चेत आहे.
सलमान खानच्या ईद पार्टीनंतर शहनाज हिचे सलमानसोबतचे वेगवेगळे फोटो समोर आल्यानंतर ती चर्चेत आली आहे.
सलमान खानची बहीण अर्पित खान आणि आयुष शर्माने आपल्या घरी ईदची पार्टी दिली होती.
या पार्टीमध्ये सलमान खान हा होस्ट होता. त्याचवेळी शहनाज गिल देखील तिथे आली होती तेव्हा तिथे त्यांची जी भेट झाली त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
शहनाज गिलने बिनधास्तपणे मीडियासमोर सलमान खानला किस केलं आणि त्याची गळाभेट केली.
फॅन्सला सलमान खानसह शहनाजचं हे जे काही बाँडिंग पाहायला मिळालं ते त्यांना खूपच आवडलं आहे.
ADVERTISEMENT