ADVERTISEMENT
तब्बल 11 वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर राजकुमार राव आणि पत्रलेखा हे अखेर 15 नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले.
हे जोडपं लग्नात खूपच सुंदर दिसत होतं. त्यांचे अनेक फोटोही आता व्हायरल होत आहे.
या सेलिब्रिटी जोडप्याला आता सर्वच जण भरभरुन शुभेच्छा देत आहेत.
पत्रलेखा ही नवरीच्या वेशभुषेत खूपच सुंदर दिसत होती.
पत्रलेखा ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पत्रलेखाने ‘सिटी लाइट्स’ सिनेमातून आपल्या बॉलिवूडमधील कारकीर्दीला सुरुवात केली होती.
याच सिनेमात राजकुमार राव हा देखील तिच्यासोबत होता. हा सिनेमा हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला होता.
पत्रलेखाचा जन्म हा मेघालयमधील शिलाँगमध्ये 20 फेब्रुवारी 1989 रोजी झाला होता.
तिचे वडील हे सीए होते. पत्रलेखा हिला दोन भाऊ आणि बहीण आहेत. तिच्या बहिणीचं नाव पर्णलेखा आणि भावाचं नाव अग्निश आहे.
पत्रलेखाने सिटी लाइट्सशिवाय लव्ह गेम्स, नानू की जानी यासारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे.
याशिवाय तिने ‘बोस: डेड/अलाइव्ह’, चिअर्स, बदनाम गली, यासारख्या वेब सीरिजमध्येही काम केलंय.
ADVERTISEMENT