बॉलिवूड सेलिब्रिटी बाहेर पडले गर्दी ही होतेच. अशावेळी गर्दीतून बाहेर पडणं सेलिब्रिटींसाठी फार मुश्किल होऊन बसतं. नुकतंच दीपिका पदुकोण एका फूड आऊटलेटवर खाण्यासाठी बाहेर पडली असता तिला फॅन्सच्या गर्दीचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर या गर्दीदरम्यान तिची पर्स खेचण्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
दीपिकाची गर्दीमध्ये पर्स खेचण्याचा हा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैदही झाला आहे. हा व्हीडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गुरुवारी रात्री दीपिकाला स्पॉट करण्यात आलं. या ठिकाणी फॅन्सची मोठी गर्दी झाली. या गर्दीतून बाहेर पडणं दीपिकासाठी फारच मुश्किलीचं झालं. याचवेळी दिपीका गाडीत बसायला जात असताना एका महिलेने दिपीकाची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र दिपीकासोबत असलेल्या व्यक्तींनी तातडीने महिलेच्या हातातून पर्स सोडवून घेतली.
चर्चेत असलेल्या दिपीकाच्या या पर्सची किंमत तब्बल 1.6 लाख इतकी आहे. लाल रंगाची ही पर्स Saint Laurent Sac De Jour ब्रँडची आहे. या पर्सवर उत्तम अशी एम्ब्रॉयडरी असल्याचं दिसून येतेयं.
पर्स खेचल्यानंतर या व्हीडियोमध्ये दिपीका काहीशी गोंधळलेली दिसतेय. या प्रकारानंतर दीपिका कशीबशी गाडीत येऊन पोहचली. दरम्यान या प्रकारानंतरही दीपिका त्या महिलेवर नाराज न होता निघून गेलीये.
ADVERTISEMENT