Pushpa 2 Movie Latest News: सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जवळपास 3 वर्षानंतर प्रदर्शित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाने लाखो चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावरही पुष्पा 2 चित्रपटाची तुफान चर्चा रंगलीय. संपूर्ण देशभरात पुष्पा चित्रपटाचा गाजावाजा सुरु असतानाच एक दु:खद घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलंय?
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यावेळी पुष्पा चित्रपटाच्या जबऱ्या चाहत्यांनी स्क्रीनिंग पाहण्यासाठी तुफान गर्दी केली. आपल्या फेव्हरेट अॅक्टरला म्हणजे अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. परंतु, लोकांच्या गर्दीचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं आणि या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. रेवती (39) असं मृत पावलेल्या महिलेचं नाव असून ती दिलसुखनगर येथील रहिवासी होती.
हे ही वाचा >> Maharashtra CM Ceremony : भाजप, शिंदे गट अन् NCP चे कोण कोण होणार मंत्री? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी
रेवती तिच्या दोन मुलांसोबत (श्री तेज (9) आणि सान्विका (7), संध्या थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. परंतु, याचदरम्या अल्लू अर्जुन तिथे पोहोचल्यावर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. थिएटर गेटच्या आत जाण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. या चेंगराचेंगरीत रेवती आणि तिचा मुलगा बेशुद्ध झाला. त्या ठिकाणीच रेवतीचा मृत्यू झाला. तर तिच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्या मुलाला केआयएमएस (KIMS) रुग्णालयात दाखल केलं आहे.
हे ही वाचा >> Maharashtra CM Oath-Taking Ceremony online : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा थेट कुठे पाहायचा?
काय म्हणाला अल्लू अर्जुन?
या घटनेनंतर अल्लु अर्जुनने इंडिया टुडेशी संवाद साधला. अर्जुनला स्क्रीनिंगला येण्यामागचं कारण विचारलं असता, तो म्हणाला, "मी चाहत्यांवर खूप प्रेम करतो. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये फिल्मचं मिड नाईड शो चाहत्यांनी खूप एन्जॉय केला आहे". चाहते थिएटरमध्ये चित्रपटाचे सीन्स कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. क्रिटिक्सने चित्रपटाला जबरदस्त रिस्पॉन्स दिला आहे.
ADVERTISEMENT