बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमीच नव्या चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करताना आजपर्यंत दिसला आहे. त्यातील सगळे चेहरे हे कोणत्या ना कोणत्या बड्या स्टारच्या मुलांपैकी होते हे वेगळं सांगायला नको. आता करण जोहर सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू करीत आहे.
ADVERTISEMENT
एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम साऊथचा सुपरहिट सिनेमा ‘हृदयम’ च्या रीमेकमधून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. या मल्याळम सिनेमात सुपरस्टार मोहनलालचा मुलगा प्रणव मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. बोललं जात आहे की हिंदीमध्ये या सिनेमाचा रीमेक करण्यासाठी करण जोहरसोबत फॉक्स-स्टार स्टुडिओ देखील निर्मात्याच्या भूमिकेत काम पहणार आहेत.
एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार हे देखील कळत आहे की, ”इब्राहिमच्या लॉन्चिंग साठी हा एक उत्तम प्रोजेक्ट आहे. तो गेल्या काही दिवसांपासून एका चांगल्या सिनेमाच्या प्रतिक्षेत होता. या सिनेमाता एका विद्द्यार्थ्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. आणि ही गोष्ट इब्राहिमच्या आताच्या वयाला साजेशी आहे”. खरंतर,करण जोहर हा इब्राहिची मोठी बहिण आणि बॉलीवूडची सध्याचा हिट अभिनेत्री सारा अली खानला देखील लॉन्च करणार होता. पण करणचा सिनेमाचा बऱ्याच दिवसांसाठी पुढे ढकललला गेला आणि मग अभिषेक कपूरच्या ‘केदरनाथ’ या सिनेमातून सारा आली खाननं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
आता इब्राहिम अली खान करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत आहे. करण जोहरनं याआधी वरुण धवन,आलिया भट्ट,सिद्धार्थ मल्होत्रा,जान्हवी कपूर,शनाया कपूर अशा स्टार किड्सना बॉलीवूडमध्ये लॉन्च केले आहे.
ADVERTISEMENT