ट्रॅक्टर रॅलीवरून झालेल्या संघर्षावर कंगना भडकली आणि म्हणाली…

मुंबई तक

• 12:27 PM • 26 Jan 2021

कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या रॅलीच्या वेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झालेला पहायला मिळाला. यावेळी शेतकरी काही केल्या मागे हटायला तयार नव्हते. सर्व प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौतने उडी घेतली. याविषयी कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या रॅलीच्या वेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झालेला पहायला मिळाला. यावेळी शेतकरी काही केल्या मागे हटायला तयार नव्हते. सर्व प्रकरणात अभिनेत्री कंगना रानौतने उडी घेतली.

हे वाचलं का?

याविषयी कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “अशिक्षित लोक असणाऱ्या एखाद्या ठिकाणी लग्नकार्य असेल किंवा घरात चांगला सण असेल तर जळणारे काका/काकू कपडे धुणं, अंगणात घाण करणं किंवा मद्यपन करून मध्येच अंगणात झोपणं, अशीच या देशाची परिस्थिती आहे. काहीतरी लाज ठेवा.”

दरम्यान कंगनाच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यावेळी मी या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटलं होतं त्यावेळी मोठ्या 6 ब्रॅण्डने माझ्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलेलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तुम्ही शेतकऱ्यांना दहशदवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवू शकत नाही. आता मला त्यांना सांगायचंय की, जे आज झालेल्या हिंसेला पाठिंबा देतायत ते सुध्दा दहशदवादी आहेत.”

एका ठिकाणी शेतकऱ्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅलीने हिंसक स्वरूप घेतलं. दिल्ली सीमेवरील आयटीओमध्ये हे आंदोलन हिंसक झालं होतं. यावेळी काही आंदोलकांनी मोर्चाचा मार्ग बदलत थेट लाल किल्ल्यावर चढाई केली होती.

    follow whatsapp