kangana Ranaut Controversy : कंगना-हृतिकचं अफेअर ठरलं वादग्रस्त, वाचा इंटरेस्टींग स्टोरी

रोहिणी ठोंबरे

• 10:32 AM • 23 Mar 2023

kangana Ranaut Hritik Roshan Controversy : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) ही आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करतेय. या वाढदिवसानिमित्त तिच्यावर बॉलिवूडसह सर्वंच क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होतोय. कंगना रणौत एक बिनधास्त अभिनेत्री आहे. बॉलिवूडमधला विषय असो अथवा राजकिय त्यावर बेधडक आपलं मत मांडत असते. यामुळे दखील ती अनेकदा वादात सापडली होती. मात्र सर्वांधिक […]

कंगना-हृतिकचं अफेअर ठरलं वादग्रस्त

कंगना-हृतिकचं अफेअर ठरलं वादग्रस्त

follow google news

kangana Ranaut Hritik Roshan Controversy : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) ही आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करतेय. या वाढदिवसानिमित्त तिच्यावर बॉलिवूडसह सर्वंच क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होतोय. कंगना रणौत एक बिनधास्त अभिनेत्री आहे. बॉलिवूडमधला विषय असो अथवा राजकिय त्यावर बेधडक आपलं मत मांडत असते. यामुळे दखील ती अनेकदा वादात सापडली होती. मात्र सर्वांधिक वाद तिचा हृतिक रोशन (Hritik roshan) सोबत अफेअरमध्ये असताना झाला होता. हा वाद अजूनही सुरु असल्याचे बोललं जात. नेमका हा वाद काय होता, हे जाणून घेऊयात. (kangana ranaut hritik roshan affair controversy her mental condition is not good sent legeal notice)

हे वाचलं का?

अफेअरची चर्चा

हृतिक रोशनचे (Hritik roshan) सुझेन खानसोबत पहिले लग्न झाले होते. या लग्नानंतर काईटस् आणि क्रिश 3 च्या शुटींग दरम्यान कंगना रणौत आणि हृतिक एकत्र सेटवर आले होते. या शुटींग दरम्यान दोघेही अफेअरमध्ये असल्याची चर्चा रगंली होती. याबाबत दोघांनीही कधीही अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली नव्हती. मात्र दोघांच्या अफेअरची अनेकांना कुणकुण लागली होती. याच दरम्यान हृतिक आणि सुझेनच्या संसाराता मीठाचा खडा पडला होता आणि तलाकपर्यंत प्रकरण पोहोचलं होतं, असे बोलले जाते.

Dalljiet Kaur : घटस्फोटित महिलांना दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या अभिनेत्रीचा खास ‘मेसेज’

हृतिकने सिनेमातून बाहेर केलं…

जानेवारी 2016 मध्ये कंगना आणि हृतिकमध्ये (Hritik roshan) वादाला तोंड फुटले होते. आशिकी 3 सिनेमासाठी मेकर्सन कंगना रणौत (kangana Ranaut) आणि हृतिक रोशनला कास्ट करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मीडिया रिपोर्टनुसार हृतिकच्या सांगण्यावरून कंगणा रणौतला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर कंगणा आणि हृतिकमध्ये बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

कंगना-हृतिकमध्ये ट्विटर वॉर

नवीन प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर कंगना हृतिकवर (Hritik roshan) खुपच भडकली होती. मीडियासमोर येऊन तिने हृतिकचं नाव न घेता सुनावले होते. एका मुलाखतीत तिने हृतिकला सिली एक्स देखील म्हटलं होतं. एक्स बॉयफ्रेंड मुर्खाच्या गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांना अटेन्शन मिळेल. पण ती आता या सगळ्यातून बाहेर पडली आहे, असे तिने स्पष्ट केले होते. कंगणाच्या या टीकेवर हृतिकने ट्विट करून प्रत्युत्तर दिले होते. मेरी पोपशी रोमान्स करण्याची शक्यता कोणत्याही उत्कृष्ट महिलेपेक्षा अधिक असल्याचे त्याने म्हटले होते.

Rani Mukerji Controversy : एका Kiss मुळे मोडलेलं राणी-अभिषेक बच्चनचं लग्न?

कंगनाला पाठवली नोटीस

हृतिक रोशनने कंगणाला एक कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती. या नोटीसीत त्याने कंगणाला (kangana Ranaut) अफेअरच्या दाव्यावर माफी मागण्याची मागणी केली होती. पण मी काहिच चुकीचे केले नाही, असे म्हणत कंगनाने माफी मागण्यास नकार दिला होता. तसेच कंगनाने त्याला अनेक मेल पाठवले होते.मात्र या मेल्सला हृतिकने दुर्लक्ष केले होते, असा आरोप देखील तिने केला होता.

मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप

कंगना आणि हृतिकंच (Hritik roshan) प्रकरण इतकं टोकाला गेलं होतं की, हृतिकने एका नोटीसीत कंगनाचे मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर कंगणाने मीडियासमोर हृतिक मानसिक समस्येचा शिकार झाल्याचे प्रत्युत्तर दिले होते. यानंतर दोघांमध्ये दुरावा आल्याचे बोलले गेले होते.

हिंदू देवी-देवतांचा अपमान?, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सापडली वादात

दरम्यान सध्या तरी या अफेअर दोन्हीकडून काहीच बोलले जात नाही आहे. कंगना तिच्या आगामी सिनेमात व्यस्त आहेत, तर हृतिक सबा आझाद सोबत अफेअरमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट देखील झाले आहेत.

    follow whatsapp